प्रतिनिधी , अंढेरा , ता. चिखली : – मिळालेल्या गुपित माहिती वरुण अमोना फाट्यावर पोलिसांनी साफळा रचला असता संशयित आरोपीची मोटारसायकल समोरवरून येतांना दिसून आली .आणि लगेच छापा टाकून गाडी ताब्यात घेतली असता आरोपी सह मोटारसायकल आणि चार बॉक्स आरोपीकडून मुद्देमाला सहित जप्त करण्यात आला . ही घटना २८ जानेवारी रोजी सायंकाळी घडली .
अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांना गुप्त बातमी दाराकडून बातमी मिळाली की दे राजा तालुक्यातील सिनगाव येथून अवैरीत्या देशी दारूचे बॉक्स अमोना व शेळगाव आटोळ येथे विक्रीसाठी घेवून जात आहे . अशी गुप्त माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक , अप्पर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे ,पोहेकॉ कैलास उगले, समाधान झिने, जाधव , यांना पेट्रोलिंग करण्याच्या निमित्ताने घटनास्थळी पाठविले , अमोना फाट्यावर गुप्त बातमी दाराकडून मिळालेल्या वर्णनाची संशयित मोटारसायकल सिनगाव वरुण शेळगाव आटोळ गावाकडे जात असल्याची दिसली , लगेच गाडीला थाबवून तपासणी केली असता मोटारसायकल क्र एम एच २८, इएन ८०७२ वर दोघे जण यांनी एका पोतडीत अवैरीत्या विना परवानावाहतूक करताना ३ बॉक्स प्रत्येकी ४८ नग असे एकूण १४४ नग व मो. सा. सह एकूण ५८६४० रु चा माल जप्त केला. आणि ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शना खाली बिट अमलदार कैलास उगले व जाधव यांनी आरोपी शरद बुजगं राव दांडगे वय ३५ वर्ष रा शिनगाव जाहगीर , विलास मधुकर भालेराव वय २३ वर्ष आणि आणखी दोन जण फरार झाले आहेत यांच्या विरुद्ध अप नं.३८ / २०२२ कलम ६५ अ ( ई ) , ८१ , ८२ , ८३ , मुंबई दारूबंदी कायदा या नुसार गुन्हा दाखल केला यापुढील तपास दुय्यम ठाणेदार वासाडे हे करीत आहेत .