घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
ग्रामसुरक्षा दल हा गावाचा आत्मा आहे.ग्रामसुरक्षा दल हे चोरांपासून गावांचे रक्षण करतात.चोरीमुळे भीतीचे वातावरण निर्माण होते.या सर्व चोऱ्या रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल खूप महत्त्वाचे आहे.समाजाचा सक्रिय सहभाग असल्यास संरक्षण करणे शक्य होते.कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्यासाठी ग्रामसुरक्षा दल आवश्यक आहे.वेळोवेळी ग्रामसुरक्षा दलाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.त्यासाठी सर्व गावाने ग्रामसुरक्षा दलाच्या पाठीमागे उभे राहावे,असे आवाहन गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी केले.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना ट्रॅकसूटच्या वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.यावेळी सरपंच पंढरीनाथ खटके,उपसरपंच अण्णासाहेब काळे,तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब गावडे,ग्रामपंचायत सदस्य नारायण वायाळ,उमेश काळे,रोहिदास पवार,अभिषेक पवार,अभिजित खटके,बाबासाहेब बोंबले,दत्तात्रय खैरे,अशोक पवार,सुभाष भोईटे,विजय खटके,नरेंद्र गाढवे,ज्ञानेश्वर शिकारे,अनिल खंडागळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बल्लाळ पुढे म्हणाले की,ग्रामसुरक्षा दल हे कोणतीही अपेक्षा न करता गावाची सेवा करत आहे.सेवा ही पुण्य प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे.कर्म करा फळाची अपेक्षा करू नका.दुसऱ्याचा द्वेष करू नका.संधी भेटेल तिथे लोकांच्या उपयोगी पडा.लोकांना मदत करा.अन पुण्य मिळवा,असे ते म्हणाले.
यावेळी सरपंच पंढरीनाथ खटके म्हणाले की,गावातील जास्तीत जास्त तरुणांनी ग्रामसुरक्षा दलात सामील व्हावे.ग्रामसुरक्षा दलाचे मनोबल वाढविण्यासाठी कायम प्रयत्न केले जातील.तुमच्या कामाचे कौतुक होणे गरजेचे आहे.आपण सर्व सदैव सतर्क राहता.तुमच्यामुळे सगळं गाव शांत झोप घेते.सेवा ही निस्वार्थी भावनेने करता येते.सेवेला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे.ग्रामसुरक्षा दलाच्या मागे ग्रामपंचायत ठामपणे उभे आहे.ग्रामसुरक्षा दलास काही कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही यावेळी देतो,असे ते म्हणाले.
यावेळी पत्रकार अनंत मुंढे,आर.व्ही.छल्लारे,पवन पवार,राजेंद्र पवार,किर्तीनंद गांगुर्डे,हरीचंद्र गावडे,बाळासाहेब भारती,शिवाजी काळे,बाबुराव राठोड,संतोष गावडे,आशुतोष धुमाळ,किरण लिपणे,कुलदीप आटोळे,संतोष हारे,जितेंद्रसिंग राजपूत,विजय सुरासे,प्रविण गायके यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
चौकट
वडीगोद्री येथे चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य,गावातील प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी यांनी लोकवर्गणीतून सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ व सरपंच पंढरीनाथ खटके यांनी केले.या आवाहनास तात्काळ प्रतिसाद देत एलआयसी विमा प्रतिनिधी सुभाष भोईटे यांनी २ हजार रुपये दिले.