Home विदर्भ Amaravati – जिल्हात विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते संपन्न

Amaravati – जिल्हात विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते संपन्न

235

प्रतिनिधी -: धनराज खर्चान


अमरावती/भातकुली -: जिल्हाच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते विविध विकास कामचे भूमिपूजन आज दी ३१ जानेवारीला झाले , त्यावेळी त्या बोलत होत्या जळका हिरापुर येथे ३ कोटी रुपये निधीतून टाकरखेडा पुसदा रोहनखेडा प्रजिमा रस्त्याची सुधारणा ,साऊर येथे २ कोटी रुपये निधीतून अंजनगाव काकडा पूर्णांनगर साऊर शिराळा रस्ता सुधारणा, सोनारखेडा येथे ३ तीन कोटी रुपये निधीतून पूर्णांनगर निरुळ गांगमाई रस्ता रामा येथे ३०१ वर लहान पुलाचे बांधकाम, तसेच खोलापुर येथे ५ कोटी ३० लक्ष निधीतून पूर्णांनगर नीरुळ वाठोडा खोलापुर रस्ता सुधारणा इत्यादी कामाचे भूमिपूजन , तर टाकरखेडा संभू येथे ६ कोटी ३८ लक्ष निधीतून ३३केव्हीं उपकेंद्राचे लोकार्पण पालकमंत्र्याच्या उपस्थितीत झाले.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.नितीन व्यवहारे,तहसीलदार निता लबडे,जिल्हा कृषी अधीक्षक अनिल खर्चान , हरिभाऊ मोहोड, जयंत देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.