Home पश्चिम महाराष्ट्र पञकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ , सदैव चांगल्या पञकारांच्या बरोबर – हर्षवर्धन पाटिल

पञकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ , सदैव चांगल्या पञकारांच्या बरोबर – हर्षवर्धन पाटिल

476

पुणे – पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याचे मत माजी संसदीय कार्यमंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार संरक्षण समिती च्या इंदापूरर्धनरा नरसिंह पुर येथे योध्दा पुरस्कार व कोरोना वितरण सोहळा , पत्रकार दिन नुकताच साजरा करण्यात आला . या प्रसंगी प्रमुख पाहुणे पाटील यांनी बोलताना व्यक्त केले . पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यात लवकरच पत्रकार भवन बांधण्यासाठी मदत करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले . कोरोना काळात निरा नरसिंह पुर बावडा परीसरातील आशा सेविका वर्कर , ग्रामसेवक , तलाटी , सरपंच , पत्रकार यांचा “पत्रकार संरक्षण समिती” , इंदापूर ( पुणे ) यांच्या वतीने सन्मान , शाल , श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , गावच्या सरपंच सौ. सरवदे ताई , पत्रकार संरक्षण समिती चे प्रदेश सचिव अनिलभाऊ चौधरी , पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ ऊंद्रे पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले . या प्रसंगी पत्रकार संरक्षण समिती पुणे कार्यध्यक्ष रविद्र खुडे , जिल्हा उपाध्यक्ष मोहन वाघ , खेड तालुका अध्यक्ष दिनेश कुऱ्हाडे , हवेली तालुका आशोक आव्हाळे , इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सुतार , डॉक्टर सरवदे , शेडगे सह इंदापूर पत्रकार आणी परीसरातील मान्यवर , राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते . सोबतच पत्रकार संरक्षण समिती इंदापूर तालुका अध्यक्ष पदी लोकमत चे पत्रकार बाळासाहेब सुतार यांची नियुक्ती व इंदापूर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली .