Home विदर्भ मुलीचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत दुचाकीला अपघात होऊन वडिलांचा मृत्यू तर आई,मुलगी...

मुलीचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत दुचाकीला अपघात होऊन वडिलांचा मृत्यू तर आई,मुलगी गंभीर जखमी

615

रविंद्र साखरे – तळेगाव शा पंत

वर्धा –  तालुक्यातील चिस्तुर येथील खासबागे कुटुंब मुलीच्या वाढदिवसाच्या खरेदीसाठी नजीकच्या तळेगाव (शा.पंत) येथून चिस्तुर येथे स्वमालकीच्या दुचाकीने परतीच्या प्रवासात राष्ट्रीय महामार्ग क्र.६ व यादव नामक ढाब्याजवळ मागाहून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अंकुश खासबागे (४५) गंभीर जखमी झाले

त्यांना तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला तर पत्नी रेणुका अंकुश खासबागे (३५) मुलगी लावण्या अंकुश खासबागे (११) या दोघी मायलेकी जखमी झाल्या या दोघी मायलेकी आधी तिवसा ग्रामीण रुग्णालयात आणि तेथून अमरावती येथे हलविण्यात आल्याचे समजते याबाबत असे की, चिस्तुर येथील खासबागे कुटुंब एकुलती एक असलेली वर्ग ५ मध्ये शिकत असलेली मुलगी लावण्ण्या हीचा ११ वा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत नजीकच्या तळेगाव (शा.पंत) येथून वाढदिवसाचे साहित्य खरेदी करून परतीच्या प्रवासात अगदी पाच सहा महिन्यापूर्वी खरेदी केलेल्या दुचाकी क्र. एम.एच. २७ डी.बी.८२५३ परतीत असताना सायं.रात्री ८ वाजता दरम्यान अपघात रूपाने अचानक काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यात अंकुश खासबागे यांचा मृत्यू झाला तर आई,मुलगी जखमी झाल्या आहेत त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीला नेण्यात आल्याचे समजते खाजबागे कुटुंबावर अचानक आलेल्या दुर्दैवी प्रसंगाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केला जात आहे पुढील तपास तळेगाव (शा.पंत) पोलीस करीत आहे.