- अमीन शाह ,
कोरोना लस घेतल्यानंतर एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून १ हजार कोटी रुपये भरपाईची मागणी करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली .या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुष्परिणामांमुळे वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला . त्या विद्यार्थिनीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी मुलीच्या मृत्यूसाठी १ हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई ची मागणी केली आहे . माझी मुलगी स्नेहल हिला लस घेण्यापूर्वी संबंधित लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले होते . स्नेहल ही आरोग्य सेविका होती.त्यामुळे तिला लस घेण्यास भाग पाडले होते . तिने लस सुरक्षित असल्याच्या हमी च्या आधारे लस घेतली होती . मात्र लस सुरक्षित असण्याचा दावा खोटा ठरला आहे . तिचा लसीच्या दुष्परिणामांमुळेच मृत्यू झाला , असा दावा करीत याचिकाकर्ते लुणावत यांनी भरपाईची मागणी केली आहे . लस सुरक्षित असल्याचा दावा खोटा आहे . असे लुणावत यांनी आपल्या याचिकेत ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या संचालकांनाही जबाबदार धरले आहे . ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या संचालकांनी कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असल्याचा दावा केला होता . वास्ताविक हा दावा खोटा असल्याचे मुलीच्या मृत्यूमुळे सिद्ध झाले आहे , असे लुणावत यांनी याचिकेत म्हटले आहे . डिसीजीआय आणि एम्सच्या पोकळ दाव्यांमुळेच माझ्या मुलीसारख्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेणे भाग पडले , याकडे लुणावत यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे .
लक्ष वेधले आहे आणखी लोकांच्या जीविताला असलेला संभाव्य धोका रोखायचाय ! याचिकेत म्हटल्यानुसार , लुणावत यांची मुलगी स्नेहल हिने २८ जानेवारी २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधक लस घेतली . त्या लसीच्या डोजचा दुष्परिणाम होऊन स्नेहलचे ०१ मार्च २०२१ रोजी निधन झाले . केंद्र सरकारच्या समितीनेही स्नेहलचा मृत्यू कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे झाल्याचे मान्य केले आहे . माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच प्रतिवादी अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कृतीमुळे आणखी काही लोकांच्या जीविताला असलेला संभाव्य धोका रोखण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे , असे म्हणणे लुणावत यांनी मांडले आहे ,महाराष्ट्र सरकार प्रतिवादी लुणावत यांच्यावतीने अभिषेक मिश्रा आणि दीपिका जैस्वाल या अधिवक्त्यांनी रिट याचिका दाखल केली आहे . या याचिकेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला , महाराष्ट्र सरकार , केंद्र सरकार , आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय , DCGI आणि एम्सचे संचालक गुलेरिया यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे . न्यायालयाने माझ्या मुलीच्या मृत्यूबद्दल ०१ हजार कोटी रुपयांची अंतरिम भरपाई देण्याबाबत सरकारला निर्देश द्यावेत , सरकार भरपाईची ही रक्कम पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून वसूल करू शकते , असे लुणावत यांनी याचिकेत नमूद केले आहे . या घटनेमुळे मात्र संबंधित यंत्रणे मध्ये मोठी खळबळ उडाली आहे ,
फोटो सौजन्य , गुगल ,