Home विदर्भ Amaravati जिल्ह्यातील धक्कादायक घटना “काय चाललं महाराष्ट्रात”

Amaravati जिल्ह्यातील धक्कादायक घटना “काय चाललं महाराष्ट्रात”

316

अमरावतीत दलितांनी पिण्याच्या पाण्यासाठी सोडले गाव

चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुर गावात वार्ड क्रमांक 1 मधील गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्या कारणाने गावकऱ्यांनी गावाच्या वेशी जवळ ठिय्या आंदोलन पुकारले. बुधवारी रात्री पासून गावावर बहिष्कार टाकला. जो पर्यंत पाणी मिळणार नाही तो पर्यंत आता मागे हटणारच नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.मागील २८ दिवसापासून वार्ड १ मध्ये ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा केला नसल्याचा आरोप दलितांनी केला आहे.फक्त दलीत वस्तीत पाणी येत नसून उपसरपचाने जाणीपूर्वक पाणी पुरवठा बंद केला आहे असा आरोप करण्यात येत आहे

प्रतिनिधी -: धनराज खर्चान