Home वाशिम पदोन्नती झालेल्या पोलीस निरीक्षकांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार व निरोप समारंभ

पदोन्नती झालेल्या पोलीस निरीक्षकांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार व निरोप समारंभ

365

वाशिम –  जिल्हा पोलीस दलामध्ये कर्तव्यास कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मुकिंदा बापु वाघमोडे, श्री.बाळू संपती जाधवर व श्रीमती नयना शेखर पोहेकर यांची सहायक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक पदी मा.अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) यांचे दि.०२/०२/२०२२ रोजीच्या आदेशांन्वये पदोन्नती करण्यात आली आहे.

त्यापैकी श्री. मुकिंदा बापु वाघमोडे व श्री.बाळू संपती जाधवर यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे तर श्रीमती नयना शेखर पोहेकर यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला येथे पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. पो.नि.श्री. मुकिंदा बापु वाघमोडे व पो.नि.श्री.बाळू संपती जाधवर यांना गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे रुजू होण्यासाठी पोलीस अधिक्षक वाशिम यांचे आस्थापनेवरून आज दि.०३/०२/२०२२ रोजी कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आज पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

होते.यावेळी वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या हस्ते सर्व पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व पोलीस अधिक्षक श्री.बच्चन
सिंह(IPS) यांनी सदर पदोन्नत अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देत निरोप दिला.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206