भेंडाळा-अर्धवन पुलावर अपघाताची मालिका सुरूच…!
यवतमाळ / मुकूटबन : भेंडाळा-अर्धवन पुलावर किरकोळ अपघाताची मालिका सुरूच असून येथे नेहमीच किरकोळ अपघात आहे. येथे मोठा अपघात होऊन कोणाच्या मृत्यूची वाट न पाहता, निरपराधांचे प्राण वाचवावे, अपघात रोखण्यासाठी दिशादर्शक फलक व संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी भेंडाळा गावातील सामाजिक कार्यकर्ते मारोती गिरसावळे, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप ठावरी व परिसरातील ग्रामवासी यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.
सचिन टोंगे रा. मार्की यांचा भेंडाळा नाल्याजवळ अपघात होऊन खाली पडला. त्याच्या डोळ्याला जबर मार लागला असून पायाला आणी हाताला सुद्धा मार लागला. सकाळी सात वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र मुकुटबन येथील प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु जास्त मार असल्यामुळे वणीला रेफर करण्यात आले. या पुलावर नेहमी अपघात होऊन सुध्दा बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत झोपेत असल्याचे सोंग घेत आहे. मुकूटबन वरून रूईकोट अर्धवन, मार्की मार्गे झरी जामणी ला पंचायत समिती व तहसील कार्यालयात जाण्याकरीता हा मार्ग असून या मार्गानेच अनेक गावाला सुध्दा जाता येते तसेच याच मार्गावरून टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल पॉवर लिमिटेड पांढरकवडा (लहान) येथील कोळसा खाणीतून कोळसा भरून आणण्यासाठी अनेक ट्रक, टिपर व कंटेनर जातात. काही ट्रक चालक दारू पिऊन ट्रक चालवतात हे ट्रक चालक रात्रीला लाईट चे अपर डीपर देत नाही त्यामुळे या पुलावरील वळणावर अनेक मोटार सायकल चालक घासरून रस्त्यावर खाली पडले.
भेंडाळा, अर्धवन, पांढरकवडा (लहान) व मुकूटबन वरून येणाऱ्या सर्व रस्त्याचा व वाहनाचा या नाल्यावरील रस्त्यावर संगम होतो. या अगोदर ही पुला वरून खाली कोसळून अनेक छोटे उपघात झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल पॉवर लिमिटेड पांढरकवडा (लहान) येथील कोळसा खाणीतून कोळसा भरून आणण्यासाठी जाणारा रिकामा ट्रक रात्रीला पुलाखाली कोसळला त्यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सहा महिन्यापूर्वी दुचाकीसह पुलारून खाली गेल्याने जबरमार लागल्याने तात्काळ दवाखाण्यात भरती करण्यात आले हाते. तिथे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या पुलाजवळ आणि या मार्गावर कोणत्याही प्रकारचे दिशा दर्शक व सुचना फलक नसल्यामुळे चालकाला रात्रीच्या वेळी अंदाज येत नाही. त्यामुळे मुकुटबन राईकोट मार्गे आलेले वाहन अनेक वेळा वाहन पुला खाली नाल्यात पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. त्यात अनेकांना दुखापत झाली व काहीना जीव गमवावा लागला आहे. बांधकाम विभागाने लक्ष द्यावे व अपघात रोखण्यासाठी दिशादर्शक फलक व संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी भेंडाळा गावातील सामाजिक कार्यकर्ते मारोती गिरसावळे, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप ठावरी परिसरातील ग्रामवासी यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.