, अज्ञात चोरट्यां विरूद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल
जिल्हा प्रतिनिधी जीवन माळी नंदूरबार
नंदूरबार येथील सरस्वती कॉलनीतील सेवानिवृत्त कर्मचारीच्या घरात चोरट्यांनी दिवसा घरफोडी करीत ७९.५ तोळे सोन्यासह २० लाख 34 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली यामुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांतर्फे परिसरातील दुकानांमधील सीसीटीव्ही तसेच घरांमधील कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डींगचे पडताळणी केली जात आहे. श्वान पथकासह पाचारण करून येथे ठसे घेण्यात आले.याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या
माहितीनुसार, नंदूरबार शहरातील गिरिविहार गेटजवळील सरस्वती नगर येथे सेवानिवृत्त कर्मचारी सखाराम गोरख पाटील त्यांच्या घरात येत्या काळात मंगल कार्य असल्याने धावपळ होती. त्यासाठी त्यांनी बँकेच्या लॉकरमधून नेहमी वापरण्यासाठी ठेवलेले दागीने काढले बुधवारी त्यांनी दागीने काढल्यानंतर खरेदीसाठी ते गुरुवारी सुरत येथे गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी दि. ३ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडत आत प्रवेश करीत घरातील बेडरूममधील लोखंडी व लाकडी कपाट फोडले. त्यातील सर्व सामान अस्तावस्त केले. लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले फिर्यादी सखाराम गोरख पाटील यांची मुलगी रूपा सखाराम पाटील साडूची मुलगी शिल्पा रतिलाल पाटील साडूचा मुलगा अमित विजय पटेल यांच्या मालकीचे सुमारे वीस लाख 17 हजार रुपये किमतीचे 79.5 तोळे सोन्याचे दागिने 10 हजार रुपये किमतीचे
घड्याळ 5 हजार रुपये रोख असा एकूण 20 लाख 34 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. शुक्रवारी दुपारी सखाराम पाटील घरी परत आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले . त्यांनी तातडीने उपनगर पोलिसांना कळविले पोलिसांनी लागलीच घटनास्थळी . धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, एलसीबीचे निरिक्षक रवींद्र कळमकर, उपनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक भदाणे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
सायंकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने घरापासून कोरीट चौफुलीकडे रस्त्यापर्यंत माग दाखविला. परंतु उपयोग झाला नाही . पोलिसांनी परिसरातील दुकानांमधील सीसीटीव्ही तसेच घरांमधील कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डींगचे पडताळणी केली जात आहे .या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी सखाराम गोरख पाटील
रा. सरस्वती कॉलनी, नंदूरबार
यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे करीत आहेत.