धर्माबाद: ता प्रतिनिधि राहुल वाघमारे
धर्माबाद नगरपालिका क्षेत्रातील फुलेनगर येथील हजरत गैब शाह रहेमतुल्ला अल्लेय दर्गा व मुस्लिम कब्रस्तानात सुशोभीकरण साठी अल्पसंख्यांक विकास निधी अंतर्गत कब्रस्तान सुशोभीकरण चे २५ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन विधानपरिषदेचे सदस्य आमदार अमरभाऊ राजुरकर यांच्या हस्ते गुरुवारी दि.३ फेब्रुवारी रोजी झाले. यावेळी आमदार अमरभाऊ राजुरकर म्हणाले, “मुस्लिम कब्रस्तानात सुशोभीकरण, व बौद्ध समशान भूमी सार्वजनिक समशान भूमी यासाठी व धर्माबाद च्या सर्वांगीण विकासासाठी येत्या मार्च,एप्रील या महिन्यात माजी मुख्यमंत्री विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. अशोकराव चव्हाण साहेब यांच्या व माझ्या डीपीटीसी आमदार निधीतून भरघोस निधी उपलब्ध करून देण्याबरोबर आगामी काळात नगर परिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांना माझे सदैव सहकार्य राहिल. अनेक विकासाचे मुद्दे घेऊन माझ्याकडे आल्यास मी सर्वांना सोबत घेऊन धर्माबाद तालुक्याचा कसा विकास होईल व कसा निधी खेचून आणता येईल यावरच माझे पूर्ण लक्ष असून त्यानुसार आपण शासकीय पाठपुरावा करावा व माझ्याकडे सादर केल्यास मी निधी आणून देण्याचा प्रयत्न करीन. अल्पसंख्यांक कब्रस्थान सुशोभीकरण कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष ताहेर पठाण यांनी केले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लालबहादूर शास्त्री महाविद्यालय संस्थेचे सचिव डॉ. कमलकिशोर काकाणी मुख्याधिकारी सौ. नीलम कांबळे सह नगरातील अनेक नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते या यावेळी धर्माबाद शहरातील अनेक समाजाचे निवेदन विविध विकासासंदर्भात आमदार अमरनाथ राजूरकर यांच्याकडे देण्यात आले.