इकबाल शेख – वर्धा
दिनांक ०४-०२-२०२२ रोजी नवीन आष्टी येथील परिसरात पोत्यात प्रेत मिळून आल्याबाबत पोलीस स्टेशन आष्टी येथे फोनद्वारे माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन आष्टी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली व सदर प्रेताची पाहणी केली असता सदर प्रेत हे जगदीश भानुदास देशमुख, वय ३५ वर्ष चे असल्याबाबत ओळख पटली. मृतकाची आई श्रीमती मथुरा भानुदास देशमुख, वय ६० वर्ष, रा. आष्टी यांनी पोलीस स्टेशन आष्टी येथे दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेवून तपास सुरू करण्यात आला. मृतकाची पत्नी व इतर नातेवाईकांना विचारपूस करण्यात आली. तपासामध्ये मृतकाचे पत्नीनेच हा घातपात केल्याचा संशय बळावल्याने तपासचे सूत्र पत्नीवर फिरविण्यात आले.
खुनाचे एक दिवस पूर्वीच मृतकाची पत्नी आरोपी क्र. १) दिपाली जगदीश देशमुख, वय ३१ वर्ष व तिचा प्रियकर आरोपी क्र. २) शुभम भीमराव जाधव, वय २२ वर्ष, रा. आष्टी तसेच शुभमचा चुलत मामा आरोपी क्र. ३) विजय रामदास माने, वय ३० वर्ष रा. आष्टी यांनी जगदीश भानुदास देशमुख यास जीवनाशी ठार मारण्याचा कट रचला होता.
सदर गुन्हाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक साहेब वेळीच लक्ष घालून सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने योग्य सूचना देवून सदरचा गुन्हा उघडकीस आणला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे सपोनि. महेंद्र इंगळे, सपोनि. संतोष शेगांवकर, सपोनि. लोकरे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार निरंजन वरभे व पथक, संतोष दरगुडे व पथक, हमीद शेख व पथक तसेच सायबर शाखेने केली.