हिवरखेडचे ठाणेदार धीरज चौहान यांच्यावर कारवाई करून अकोला मुख्यालयात बदली करावी या बाबत पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन…!
अकोला :- पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आणि मानवाधिकार प्रभारी महाराष्ट्र प्रभारी समीर अहमद शेख हे नेहमीच गरीब निराधार लोकांना मदत करताना दिसतात आणि त्यांनी पोलीस प्रशासनालाही खूप मदत केली आहे.महाराष्ट्रासह इतर राज्यांत सुद्धा त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रेस मीडिया टीमही आहेत.आडगाव बु.येथे सध्या डॉ.झाकीर हुसेन एज्युकेशन वेल्फेअर सोसायटीने बांधलेली मोहम्मदिया प्राथमिक शाळा बेकायदेशीर पध्दतीने व अतिक्रमण करून बांधण्यात आली आहे.याच शाळेत खुलेआम तार,वायर टाकून वीज जोडणी घेण्यात आली आहे.त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.त्याच्या निषेधार्थ पत्रकार समीर अहमद शेख यांनी माहिती अधिकार टाकून त्यांच्यावर प्रशासक बसवला होता.
त्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शाळा बेकायदेशीरपणे बांधल्याचा आणि शाळेत घाणीचे साम्राज्य असल्याचा कांगावा केला. त्याच शाळेच्या आत शॉपिंग मॉल्स आणि असंख्य व्यावसायिक घरे आहेत, त्यामुळे मुलांना इथे शिक्षण घेता येत नाही.
बोगस कागदपत्रे बनवली गेली आहेत, मूळ कागदपत्र मोहम्मदिया स्कूलचे संचालक राजिक कुरेशी यांच्याकडे नाहीत, असे स्पष्ट शब्दात चौकशी अहवाल लिहिले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. १४ डिसेंबर २०२१ रोजी खंडेलवाल हे अकोल्याचे आमदार झाले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी संपूर्ण जिल्ह्यात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला होता हिच गोष्ट साधत राजिक कुरेशी यांनी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी पत्रकार समीर अहमद शेख आणि त्यांचे ६० वर्षीय वडील यांच्या विरोधात हिवरखेड पोलीस ठाण्यात हिवरखेडचे ठाणेदार धीरज चौहान यांच्या सोबत पैशाचा व्यवहार करून तात्काळ पत्रकार समीर अहमद शेख व त्याचे वडील शेख बरकत उल्ला त्यांचे विरोधात ४३६,१४३ अन्वये गुन्हे दाखल केलेत.खेदाची बाब म्हणजे या शाळेच्या आत व बाहेर दोन्ही बाजूला सीसीटीव्ही बसवले आहेत, सीसीटीव्ही न तपासता, तपास न करता एवढा मोठा गुन्हा दाखल केला ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विशेष म्हणजे, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेचे संचालक राजिक कुरेशी यांनी शाळेचे बोगस कागदपत्रे बनवलेले असल्याचे स्पष्टपणे नमूद केले असताना, त्यांचे मूळ कागदपत्रे नसताना मग पत्रकार समीर अहमद शेख आणि त्याच्या वडिलांनी कोणती कागदपत्रे जाळली हा चिंतेचा विषय बनला आहे.
राजिक कुरेशी यांच्या अवैध गोवंश कत्तलखाण्याचा हिवरखेडचे ठाणेदार धीरज चौहान यांना हफ्ता मिळत असल्याचे समीर खान यांनी निवेदनात नमूद केले आहे. पत्रकार समीर अहमद शेख यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत चालणारे सर्व अवैध धंदे प्रकाशित केले होते, त्याची खिल्ली उडवत ठाणेदार धीरज चौहान यांनी पत्रकार समीर अहमद शेख व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर आणले त्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे समीर शेख यांनी म्हटले आहे.