Home वाशिम पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनात वाशिम जिल्हयात प्रथमच बायो डिझेलचा साठा जप्त

पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनात वाशिम जिल्हयात प्रथमच बायो डिझेलचा साठा जप्त

161

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वाशिम:-मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासुन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा या करीता जिल्हयात वेळोवेळी नाकाबंदी/कोम्बींगचे आयोजन करुन अवैध्य धंदयावर कारवाई,मालमत्तेच्या गुन्हयातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा चालुच ठेवला आहे.
मा. पोलीस अधिक्षक वाशिम यांना बायो डिझेलच्या नावाने इंडस्ट्रियल ऑईल विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोनि स्थागुशा सोमनाथ जाधव यांना सदर माहितीची खात्री करण्यास सांगुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन बायो डिझेलच्या नावाने इंडस्ट्रियल ऑईल विक्री
करण्याकरीता साठवणुक करण्यात येणाऱ्या ठिकाणी जावुन इसमाविरुध्द कारवाईचे आदेश दिले.दिनांक ०४/०२/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथील पथक गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे वाशिम ते केकतउमरा रोडवरील गोटे कॉलेज समोरील एका टिनशेड मध्ये
औदयोगिक इंधन या नावाने बायोडिझेल एका टाटा ४०७ गोल्ड क्र एमएच २८ बीबी ४१३९ या वाहनातुन
बेकायदेशीर रित्या इलेक्ट्रीक पाण्याची मोटार व पाईप लावुन टिन शेड मधील प्लस्टीक टाकीमध्ये उतरवित
असताना मिळुन आले. नमुद ७ इसमांना पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्यांची विचारपुस केली असता त्यांचेकडे सदर औदयोगिक इंधन विक्री व साठवणुक करण्याबाबतचा परवाना आहे किंवा कसे याबाबत विचारणा केली असता त्यांचेकडे कोणताही परवाना नसल्याचे पंचासमक्ष सांगितले. त्यावरुन नमुद आरोपीतांकडुन इंडस्ट्रियल
आईल अंदाजे ६०००/- लिटर एक टाटा ४०७ एमएच २८ बीबी ४१३९ व इतर साहित्य असा एकुण
१५,९४,२५०/- रुपयाचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करुन पुढील कायदेशीर कारवाई करीता मा. तहसिलदार व पुरवठा निरिक्षक तहसिल कार्यालय वाशिम यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले.
सदर कारवाईत मा. पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे
यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव,सपोनि प्रमोद इंगळे, पोउपनि पठाण,पोहवा किशोर
चिंचोळकर,पोना राजेश गिरी,अमोल इंगोले,प्रशांत राजगुरु,पोशि संतोष शेणकुडे यांनी सहभाग नोंदविला.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206