Home रायगड देणे समाजाचे…चला,शैक्षणिक मदतीचा हात बनुया..

देणे समाजाचे…चला,शैक्षणिक मदतीचा हात बनुया..

184

रमाई माता आंबेडकर जयंती निमित्त व वॅलेन्टाईन सप्ताहच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमाचा सहजसेवा फाउंडेशनचा पोलिसांच्या मदतीने सामाजिक उपक्रम..

वंचित व उपेक्षित मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सहजसेवेचे पुढचे पाऊल..

खोपोली – कर्जत खालापूर तालुक्यात विविध ठिकाणी लहान मुले शाळा शिकण्याच्या वयात विविध कारणास्तव भीक मागत असतात. काहींना परिस्थितीमुळे तर काहींचे पालक कोवळ्या वयात गमावल्यामुळे ही वेळ बऱ्याच मुलांवर येते, त्यामुळे कधी कधी प्रबळ इच्छा असूनही ते शिक्षण घेऊ शकत नाहीत तसेच हातावर पोट भरणाऱ्या समाजात शिक्षणाचे महत्त्व न कळल्याने वर्षानुवर्षे शिक्षणाची दारे न बघणारी मुले आता शैक्षणिक प्रवाहात आणण्याच्या उपक्रमाचा माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभारंभ करण्यात आला तसेच जगभरात वॅलेन्टाईन सप्ताहच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ हा समाजास नवीन दिशा देणारा ठरेल.

खोपोली येथील कचरा विकून उदरनिर्वाह करणाऱ्या आई वडिलांचे छत्र हरवल्याने अनाथ असलेल्या मुलाची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी स्वीकारून दिनांक 07 फेब्रुवारी 2022 पासून या उपक्रमाची सुरुवात करताना खालापूर तालुका पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शन लाभणार आहे. यानिमित्ताने भीक मागणाऱ्या मुलांचे पुनर्वसन होण्यास मदत होईल.

अशा प्रकारच्या मुले आढळल्यास संस्थेला माहिती कळविण्याचे आवाहन सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी केले आहे. या उपक्रमात मार्गदर्शन व मदत करण्यासंबधीचे पत्र सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने मार्गदर्शक मोहन केदार, उपाध्यक्षा इशिका शेलार,सचिव वर्षा मोरे,कार्यवाह बी. निरंजन,जयश्री भागेकर यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी,खालापूर व खोपोली पोलीस स्टेशनला दिले.

वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सुरू असलेली सहज निसर्ग शाळा हा उपक्रम सातत्यपूर्ण राबवून आता
समाजातील वंचित व उपेक्षित घटकाला शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे सहजसेवा फाउंडेशन प्रभावीपणे करीत आहेत.समाजाने यात आपले भरीव योगदान द्यावे, असे आवाहन खालापूर तालुका पोलीस उप विभागीय अधिकारी संजय शुक्ला यांनी केले आहे.