Home यवतमाळ माता रमाई यांचे जयंती प्रीत्यर्थ त्रिवार अभिवादनाचा कार्यक्रम….

माता रमाई यांचे जयंती प्रीत्यर्थ त्रिवार अभिवादनाचा कार्यक्रम….

228

यवतमाळ –  स्थानिक पाटीपुरा परिसरात असलेल्या अंबिका नगर, राजाराम नगर, सेजल रेसिडेन्सी, रमाई पार्क, अशोक नगर, आंबेडकर नगर, पाटीपुरा मध्य, दलित सोसायटी या संपूर्ण परिसरामध्ये असलेल्या बुद्ध विहारातील बुद्ध मूर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून आज माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती चा समारोप विशाखा बुद्ध विहार अंबिका नगर येथे करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलनाचे प्रमुख उमेश मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आपले मत व्यक्त करीत असताना मत मांडले की, माता रमाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण जीवन पटात अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. त्यांच्या अस्तित्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्तित्व निर्माण करायला अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांनी स्वतः झिजून बाबासाहेब घडविण्याचे काम केले आहे. असेच माता रमाई चे संस्कार माझ्या समाजातील प्रत्येक माता-भगिनीत दिसले पाहिजे. समाजातील प्रत्येक भगिनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी माता रमाई सारखा त्याग खरोखर करेल काय? हाही प्रश्न याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते उमेश मेश्राम यांनी उपस्थित केला.


याप्रसंगी प्रमोदिनी ताई रामटेके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पाटीपुरा, भिम टायगर सेना युवा अध्यक्ष विजय धुळे, शतील रंगारी ( बँक मॅनेजर) धम्म बंधू दीपक पाटील, रितेश देशभ्रतार, संतोष पाटील, शिवा राऊत, रंजीत रामटेके, सतीश मेश्राम, रितेश मुन, सुनील पाईकराव, पद्माकर वैद्य, अक्षय भोसले, शितल मेश्राम, मिलिंद कांबळे, पिंटू मेश्राम, चंदन काळे, गौतम मेंढे, अल्पेश कोटंबे, प्रमोद रामटेके, विनोद डोंगरे, सचिन वाटकर, ऋषीनाथ मेश्राम, संतोष पुनवटकर, मनोहर देशभ्रतार, संदीप देवतळे, राजू नांन्हे, प्रवीण खंडारे, नागोराव मेश्राम, गौतम गोंडाणे, उत्तम मानकर, मारोती रामटेके, प्रशांत वनकर, चंदन डोंगरे, बाबाराव घायवान, हरीश रामटेके, सुशील चोखांद्रे, सचिन गजभिये, महेंद्र मेश्राम, सुमित गोंडाणे, सुमित वाघमारे, वर्षा महेंद्र मेश्राम, निलेश पुनवटकर, बाबू फुटाणे, विशाल तेलंगे, सदानंद मोडक, धनराज रामटेके, विनोद मेंढे, विनोद ढोकणे, संदीप वानखडे, अजय वनकर, राजू बनकर, सचिन डोंगरे, शंकु वानखेडे, एड. खडसे, गौतम तडसकर, अनिकेत वैद्य, अक्षय नगराळे, विषाल मेश्राम, संजय खानविलकर, राहुल माने, विकी मेश्राम, प्रेमदास बोरकर, राहुल वासनिक, दिघाडे गुरुजी, शांताराम कांबळे, मनोज लोखंडे,अमोल बोरकर, वाजिद खा: पठाण, फिरोज शेख, अतुल पांडे, सुभाष मेश्राम, रामदास लोणारे, सुनील पांडे, प्रवीण गजभिये, प्रकाश शेंडे, अरविंद कोसे, शीलाताई मेश्राम, सुवर्णा रामटेके, दर्शना मेश्राम, सुष डोंगरे, अर्चना शेंडे, प्रभा घुटके, ललिता मेश्राम, सुमनबाई लोणारे, संगीता पाटील, संगीता सुभाष मेश्राम, आकांक्षा मुन, भारती वागदे, शितल रामटेके, मेश्राम धुरपताबाई मेश्राम, रेखाबाई मुन, गिताबाई रामटेके, विना कोटंबे, माया देशभ्रतार, मंदा येसनकर, स्वाती तुपे, चंदाबाई वनकर, चारुशीला इंदुरकर, सारिका डोंगरे, रेखा वानखेडे, सुनिता पायघन, अन्नपूर्णाबाई खानविलकर, ममता विशाल मेश्राम, शालुबाई विनोद जवादे, पल्लवी लोखंडे, उषा नाईक, सीमा फुलझेले, कुसुम राऊत, रेखा रंगारी, नीलिमा पाटील, पार्वताबाई मेश्राम, प्रमिला अवचित जांभुळकर, सविता सुनील खोब्रागडे, गिरीधर भगत, घनश्याम डोंगरे, पुरुषोत्तम भजगवरे, अशोक मून, सुरज बोरकर, केतन कोटांगळे, कैलास ताकसांडे, देवानंद नाईक, राजू रंगारी, राजकुमार भरोसे, इत्यादी मोठ्या संख्येने प्रत्येक बुद्ध विहारांमध्ये माता रमाई च्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी बंधू-भगिनी उपस्थित होते.