यवतमाळ / घाटंजी – बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरागड येथील पावन भूमीतील भगवान संत सेवालाल महाराज यांच्या पाचव्या पिढीचे वंशज संत रामराव बापू यांचे उत्तराधिकारी पोहरागड धर्मपीठाधीश्वर महंत प.पुं. बाबूसिंग महाराज यांचे शुभहस्ते घाटंजी नगरीतील प्रोफेसर कॉलनी स्थित संत सेवालाल महाराज मंदीरात महाभोग भंडारा, पुजा-अरदास करून घाटंजी तालूका बंजारा समाजाच्या वतीने मोहन जाधव, तांड्याचे नाईक नामदेवराव आडे, सुधाकराव राठोड़ सर, कारभारी अरविंद जाधव, काशीनाथ आडे सर, डाव बंडू जाधव, सुनिल जाधव सर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवि आडे, विजय राठोड, प्रदीप राठोड़, गोर गणेश राठोड, गिरीधर राठोड़, गणेश चव्हाण, राजेश राठोड, मोतीलाल आडे यांच्या शुभहस्ते धर्मपीठाधीश्वर महंत बाबूसिंग महाराज, महंत राजाराम महाराज, महंत हरीदास महाराज, महंत विनोद महाराज, प्रेमदास महाराज, राहुल महाराज सर्व संत महंताचे पूष्पहार, शाल, श्रीफल, भेंट देवून सत्कार करण्यात आले, सर्व समाज बांधव भावीक भक्तांनी बापूंचे आशिर्वाद घेतले
या प्रसंगी साखरा, वासरी, मोवाडा, जरंग सेवानगर, शिवणी, आंबेझरी, दत्तापुर, आमडी, तिवसाळा ताड्यातील समाज बांधवानी आपली उपस्थिति दर्शवून, महंताचे आशीर्वाद व प्रसादाचा लाभ घेतले, लगेच शिवणी येथील शुभ कार्यासाठी संत महंताचे प्रस्थान झाले, कार्यक्रमाचे संचलन रवि आडे सर यांनी केले, तर सर्व मान्यवराचे आभार, समारोप सुनील जाधव सर यांनी केले.