Home यवतमाळ बोरी केंद्राचे केंद्र संमेलन दुधगाव येथे संपन्न

बोरी केंद्राचे केंद्र संमेलन दुधगाव येथे संपन्न

146

यवतमाळ / बोरी अरब 9:- दि.४/२/२२रोजी बोरी केंद्राचे केंद्र संमेलन दुधगाव येथे संपन्न झाले. दुधगाव शाळेचे मु .अ . किशोर गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी मधुकरराव काठोळे राज्याध्यक्ष सर्व संघटना ,टागोर विद्यालयाचे प्राचार्य चवरे सर ,केंद्राचे केंद्र प्रमुख विठ्ठलदास आरू, शेलोडी केंद्राचे केंद्र प्रमुख इंगळे सर, चाणी केंद्राचे केंद्र प्रमुख राठोड सर ,आणि सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सिरसाठ सर उपस्थित होते.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि पाहुण्याच्या स्वागताचे कार्यक्रमाची सुरवात झाली सेवानिवृत केंद्र प्रमुख सिरसाठ यांचा केंद्रातील सर्व शाळेने सपत्नीक सत्कार केला शाल श्रिफल आणि भेट वस्तू देऊन जड अंतकरणाने निरोप दिला केंद्राच्या वतीने आरू सरांनी निरोप दिला नवीन केंद्रप्रमुख म्हणून आरू सरांचा सत्कार सर्व शाळांनी केला. भावस्पर्शी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुधगाव उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अजमत सर यांनी उत्कृष्ट भाषाशैलीनी प्रास्ताविक केले दुधगावच्या मराठी आणि उर्दू शाळेच्या संयुक्त आयोजनाने कार्यक्रम बहारदार झाला. मधुकरराव काठोळे ,चवरे सर, तसेच सर्वच शाळेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सिरसाठ सर यांना निरोप त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला आणि आरू सरांचे स्वागत केले. सिरसाठ सरांनी निरोप कार्यक्रमाला उत्तर देताना भावना अनावर झाल्या होत्या. सर्वांनी आरू सराना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. इंगळे सरांची शेलोडी केंद्र प्रमुख म्हणून आणि राठोड सरांची चाणी केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचा संचालन स्वाती खोजरे ने यशस्वीरित्या पार पाडले. शेवटी उर्दू शाळेचे खान सरांनी आभार मानले. दुधगावच्या दोन्ही शाळेच्या मु अ आणि सर्व शिक्षकांनी सर्वांना विठ्ठल शुद्ध शाखाहारी भोजनालय येथे स्वादिष्ट भोजन दिले सर्वांनी दुधगावच्या शाळेचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिर सर . कशबुद्दिन सर. कोरडे सर ढेंबे सर. अतिक सर. खोजरे मॅडम शबनम मॅडम वडकर मॅडम व केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी सहकार्य केले.आभार प्रदर्शन कशबुद्दिन सर यांनी केले.