Home सातारा मायणी ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यमानाने 71 वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा

मायणी ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यमानाने 71 वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा

126

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. २८ :- खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत मायणी व विविध शालेय संस्थेच्या विद्यमानाने मायणी येथील गांधी मैदानावर प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साह पुर्ण वातावरणात पार पडला प्रसंगी लोकनियुक्त सरपंच युवानेते सचिन गुदगे यांनी ध्वजारोहण केले या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खटाव चे माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर होते भगतसिंग विध्या मंदिर व अनंत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुलवामा अटॅक ड्रामा सादर केला तसेच मराठी मुलींची शाळा मुलांची शाळा या विद्यार्थ्यांनी पोवाडा बालगीते देशभक्तीवर गीते समूहगीत सादर करून नागरिकांची मने जिंकली यानंतर गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान करण्यात आला यामध्ये याप्रसंगी युवा नेते सचिन गुदगे म्हणाले आपण आपल्या देशाचे रक्षण प्राणापलीकडे केले पाहिजे सर्वांनी संविधान समजून घेऊन आचरण केले पाहिजे गरजेचे असून गेल्या सव्वा दोन वर्षांत झालेल्या विकास कामाचा आढावा घेतला अध्यक्षस्थानी भाषणात डॉक्टर दिलीपराव येळगावकर म्हणाले देशासाठी प्राण देणाऱ्या हुतात्म्यांना स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे आता यांना सीमेवर जाऊन लढण्याची गरज नाही पण जे काम स्वीकारले आहे ते प्रामाणिकपणे करणे त्यातून देशभक्तीची प्रगती होणार आहे यानंतर मायणी गावच्या विकासाबाबत रिंग रोड टेंभू योजना पाणी पुरवठा येरळवाडी पाणी पुरवठा शेतीपाणीपुरवठा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमास सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र स्वातंत्र्यसैनिक उत्तर अधिकारी संघटनेचे पदाधिकारी याला प्रमुख शिक्षक शिक्षका व ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते सूत्रसंचालन राज फाउंडेशन अध्यक्ष राजू कचरे यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.