यवतमाळ / घाटंजी:- तालुक्यातील किन्ही (कि) येथील प्रकाश प्रेमदास राठोड (34) यांस मानेवर चाकुने मारुन गंभीर जखमी करुन जिवानिशी ठार केल्या प्रकरणी फिर्यादी भारत राठोड यांच्या तक्रारीवरून आरोपी अमोल सुभाष पवार हेंमत सुभाष पवार व विरेंद्र राठोड विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 34 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून घाटंजीचे ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किशोर भुजाडे हे पुढील तपास करीत आहे.
गुरुवारी सायंकाळी 6 वाजता फिर्यादी भारत राठोड (45) चा पुतण्या प्रकाश प्रेमदास राठोड (34) याने आरोपींतास दररोजच्या बचत खात्यातून (आर. डी.) पैसे मागीतले असता आरोपीतांनी वाद करुन आरोपी हेंमत सुभाष पवार याने प्रकाश राठोड ला मानेवर चाकुने मारुन गंभीर जखमी करुन जिवानिशी ठार केले. अशा तक्रारीवरुन आरोपी विरूध्द खुन केल्याचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना घाटंजी पोलीसांनी अटक केली आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक किशोर भुजाडे हे आपल्या पथकासह संबधित आरोपींची पोलीस कोठडी मिळविण्यासाठी घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात गेले असता घाटंजी येथील न्यायालयाचे न्यायाधीश हे रजेवर असल्याने आरोपीतांची पोलीस कोठडी मिळविण्यासाठी पांढरकवडा येथील न्यायालयात आरोपींना नेत असल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस उप निरीक्षक किशोर भुजाडे यांनी दिली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक किशोर भुजाडे हे करीत आहे.