वाशिम:- दि.११.०२.२०२२ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम येथे कल्याण शाखेमार्फत पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय यांचेकरिता मार्गदर्शन व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमास उपस्थित मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह(IPS), डॉ.रवींद्रकुमार अवचार(MBBS,MD), डॉ.शशी पवार (M.Phil,PHD in English) यांच्या स्वागताने करण्यात आली.
पोउपनि.संतोष जंजाळ यांनी प्रास्ताविक करत सदर कार्यक्रमाची गरज व रूपरेषा स्पष्ट केली. त्यानंतर पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम येथे कार्यरत वरिष्ठ श्रेणी लिपिक श्री.गायकवाड यांनी पोलीस अंमलदार यांचेसाठी कल्याण शाखेअंतर्गत चालणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत माहिती दिली. सदर प्रसंगी वाशिम जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी सपोनि.श्री.विजय जाधव,स्था.गु.शा.,वाशिम यांनी तसेच सपोउपनि.श्री.गणेश सरनाईक व पोशि.श्री.प्रदीप बोडखे, वाशिम शहर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सोबतच पोलीस अंमलदार यांचे
कुटुंबीय श्री.मुरलीधर उत्तरवार यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सपोनि.श्री.विजय जाधव व मपोहवा.बेबी राठोड यांनी अपघातग्रस्त मुलीस वेळेवर रुग्णालयात नेत वैद्यकीय मदत मिळवून दिल्याबद्दल, पोना.श्री.प्रवीण शिरसाट व मपोना.दशमा शिरसाट या पोलीस दाम्पत्याने कोरोनाकाळात कामगारांना धान्य वाटप करत मदत केल्याने व पोना.श्री.प्रदीप बोडखे हे गरीब, गरजू व होतकरू मुलांना पोलीस भरतीचे मोफत मैदानी प्रशिक्षण देत असल्याने या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देत
सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमास प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ.रवींद्रकुमार अवचार (MBBS,MD), डॉ.शशी पवार (M.Phil.PHD in English) यांनी त्यांच्या व्याख्यानात पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय यांच्याशी संवाद साधत मार्गदर्शन केले. पोलिसांच्या सतत २४ तास कर्तव्य व कामाच्या ताणामुळे कुटुंबामध्ये ताण-तणाव निर्माण होऊन अनेक कौटुंबिक समस्या उद्भवतात. त्यामुळे पोलिसांनी घरी जातांना बाहेरची नकारात्मकता बाहेरच ठेवून घरी खेळीमेळीचे वातावरण ठेवत जबाबदार कुटुंबप्रमुखाप्रमाणे आपली कौटुंबिक
जबाबदारी पार पाडावी. यावेळी पोलीस अंमलदार व कुटुंबीय यांचा ताण-तणाव व्यवस्थापन कार्यक्रमाबाबत अभिप्राय घेण्यात आला असता अश्याप्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी घेण्यात यावे जेणेकरून पोलिसांना ताण-तणाव दूर करण्यास मदत होईल. त्यावर मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांनी पुढील ताण-तणाव व्यवस्थापनाचा कार्यक्रम नविन पोलीस वसाहत येथे घेण्याचे योजीले आहे अशी माहिती दिली. शेवटी मपोउपनि.स्वाती इथापे यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली. या ताण-तणाव व्यवस्थापन
कार्यक्रमासाठी एकूण ४० पोलीस कुटुंबीय हजर होते.सदर कार्यक्रम मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे(IPS) यांच्या नियोजनात परिविक्षाधीन सहायक पोलीस अधिक्षक महक स्वामी(IPS), परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक श्री.अमर मोहिते, पो.नि.श्री.ब्रम्हदेव शेळके, प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गृह), पोउपनि.संतोष जंजाळ, पोउपनि.राहुल चौधरी व मपोउपनि.अश्विनी धोंगडे, मपोउपनि.स्वाती इथापे यांचे उपस्थितीत पार पडला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोहवा.बेबी राठोड, पोना.प्रवीण शिरसाट, पोशि.विठ्ठल सुर्वे, मपोशि.राणी तायडे आदींनी जबाबदारी पार पाडली.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206