Home नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे चालू सीजन मध्ये ८९ हजार क्विंटल कापसाची...

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे चालू सीजन मध्ये ८९ हजार क्विंटल कापसाची आवक

100

 

धर्माबाद : ता. प्रतिनिधि राहुल वाघमारे

नांदेड जिल्यातील धर्माबाद येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध जिनिंग मध्ये चालू सीजन मध्ये तब्बल८९ हजार क्विंटल कापसाची आवक झाली असून त्या पोटी बाजार फीस म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीस तब्बल ३६ लक्ष रुपयाचे उत्पन्न मिळाले असल्यामुळे नूतन सभापती राम पाटील बनाळीकर यांच्या निर्णयाचे हे एक यशस्वी फलित समजल्या जात आहे.यावर्षी १३ऑक्टोबर रोजी अधिकृतरित्या कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. कापूस विक्रेते शेतकरी व व्यापारी हे धर्माबादच्या महावीर फायबर्स, मनजीत कॉटन, व एल.बी. कॉटन या कापूस प्रोसेसिंग कंपन्यांमध्ये व वेगवेगळ्या किरकोळ व्यापाऱ्याकडे कापूस विकत होते. त्यामुळे बाजार समितीच्या फीसच्या संदर्भात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्या अनुषंगाने नूतन सभापती राम पाटील बनाळीकर यांनी धर्माबाद मार्केट यार्डात कापूस हा लिलाव पद्धतीने होईल व त्यावर बाजार समिती ही फीस आकारेल असा निर्णय घेतला. या निर्णयास भरभरून प्रतिसाद मिळत असून दररोज प्रचंड प्रमाणात कापसाची आवक होत असून शेतकऱ्यांच्या कापसाला भावही समाधानकारक मिळत असून त्यापोटी बाजार समितीचे उत्पन्नही भरघोस प्रमाणात वाढत आहेत. आतापर्यंत८९ हजार क्विंटल कापसाची आवक धर्माबाद मध्ये झाली. त्यापैकी ७५ हजार क्विंटल कापूस उपरोक्त कापूस प्रोसेसिंग करणाऱ्या जिनिंग फॅक्टरीने घेतले तर१४हजार क्विंटल कापूस हे बाहेरच्या व्यापाऱ्यांनी घेतले. सुरुवातीला सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव होता. पण आजच्या घडीला कापसाला नऊ हजार७५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असून कधीकधी तो दहा हजाराच्या घरातही जात आहे. तर कधीकधी कमी होत आहे. पण नऊ हजार ते १० हजारच्या दरम्यान भाव स्थिर आहेत एवढे नक्की! या खरेदी-विक्री प्रक्रियेमध्ये मात्र बाजार समितीचे केवळ चालू सीजन मधून कापसातून मिळालेले फीस पोटी उत्पन्न३६ लक्ष रु.च्या घरात जात असून कापूस खरेदी विक्री प्रक्रिया ही अजूनही दोन महिने चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.