Home महत्वाची बातमी रिसोड शहरातील सराईत गुन्हेगार रमेश किसन काळे याचेवर एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई

रिसोड शहरातील सराईत गुन्हेगार रमेश किसन काळे याचेवर एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई

119

 

वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक सो श्री बच्चन सिंह यांनी यांच्या आदेशाने मालमत्तेच्या गुन्हयात वाढझाल्याने
वाशिम जिल्हयातील गुंडाच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबुन जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करुन वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत सर्व ठाणेदार यांना आदेशित केले.
रिसोड शहरातील लुटमार करणारा कुख्यात गुंड रमेश किसन काळे याच्या वाढत्या समाजविघातक कृत्यावर आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी उच्च प्रतिची व परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्यास आदेशीत केले.त्याअनुषंगाने सदर गुंडा विरूद्ध एम.पी.डी.ए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून मा. पोलीस अधिक्षक सो यांना सादर केला. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून पोलीस अधिक्षक यांनी सदरचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी सो श्री.
शण्मुगराजन यांना सादर केला.
जिल्हादंडाधिकारी श्री. शण्मुगराजन यांनी सादर प्रस्तावाचे बारकाईने व कायद्याच्या तरतुदीचे योग्य अवलोकन करून दिनांक ११/०२/२०२२ रोजी सदर इसमाविरूद्ध स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले. सदर आदेशाच्या अनुषंगाने कुख्यात गुंड रमेश किसन काळे यास स्थानबध्द करून जिल्हा कारागृह वाशिम येथे दाखल
करण्यात आले.यापुर्वी अशाच प्रकारची कारवाई सन २०२१ मध्ये कुख्यात गुंड टिल्या उर्फ आमीर खान,राहुल धबाले, बाळु यलप्पा गायकवाड यांचेवर करण्यात आली होती. तेव्हापासुन गुंड टिल्या उर्फ आमीर खान,राहुल धबाले बाळु यलप्पा गायकवाड यांच्या गुन्हेगारी कृत्यावर कायद्याची जरब बसली आहे. व त्याची जनतेमधील असलेली दहशत संपुष्टात आली असुन रिसोड शहरातील नागरिक भयमुक्त वातावरणामध्ये राहतील. त्याचप्रमाणे
सन २०२१ मध्ये ०५ तर सन २०२२ मध्ये ०२ इसमांवर एमपीडीए ची कारवाई करण्यात आली असुन, मा.पोलीस अधिक्षक,श्री बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्या पासुन एकुण ०४ इसमांवर एमपीडीए कारवाई
करण्यात आली आहे. सन-२०१९ मध्ये ००, सन २०२० मध्ये ००, सन २०२१ मध्ये एकुण ०५ इसमावर तर
सन २०२२ च्या अवघ्या दोन महीन्यातच एकुण ०२ इसमांवर एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. वाशिम जिल्हयातील कुख्यात गुंडाविरूध्द कारवाईचे सत्र असेच सुरू राहणार आहे.मा. पोलीस अधिक्षक सो श्री. श्री बच्चन सिंह व मा. जिल्हादंडाधिकारी यांनी जनतेस आवाहन केले की,वाशिम जिल्हयात अशा प्रकारचे गुंडगिरी करणारे इसम यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल, तरी जनतेने अशा गुंड प्रवृत्तीच्या इसमांविरूद्ध न घाबरता पुढे येवुन पोलीस ठाणे येथे तकारी कराव्यात जेणे करून अशा गुंड प्रवृत्तीच्या इसमांच्या मुसक्या आवळण्यात येतील.सदर स्थानबध्दतेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात मा.अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पुजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस
निरीक्षक सोमनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, पोलीस उप निरीक्षक शब्बीर खान पठाण नापोकाँ प्रशांत राजगुरू,राजेश गिरी,राजेश राठोड पोका अविनाश वाढे,डिंगावर मोरे स्थानिक गुन्हे शाखा वाशिम तसेच पोलीस स्टेशन रिसोड चे सहायक पोलीस निरीक्षक,श्री गवई यांचे पथकाने मोलाची कामगिरी बजावली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206