अमरावती / धामणगांव रेल्वे ::तालुक्यातील गिरोली या गावात शेतातून जाणाऱ्या विधुत तारेंचा एक मेकांना स्पर्श होऊन निघालेल्या आगेत शेतकरी गोपाल देशमुख यांच्या अंदाजे 3 एकर शेतातील ऊस पिक पूर्णपणे जळून खाक झालेला आहे.
गावाकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हवेमुळे आगीने उग्र रूप धारण केल्यामुळे शेतातील ऊस पिक पूर्णपणे जळला आहे.
संबंधित घटनेची माहिती तलाठी,, कृषी अधिकारी व पोलीस स्टेशन ला देण्यात आली असून झालेला घटनेची तपासणी करून शेतकऱ्याला या अश्या संकट समयी शासनाने योग्य मदत करावी असा सूर गावातील शेतकरी करत आहे. अगोदरच हवालदिल झालेला शेतकरी आणि त्यात महावितरण चा हलगर्जी पणा असे आकास्मित संकट आल्या मुळे शेतकऱ्याला शासना तर्फे योग्य मोबदला देण्यात यावा. अशी विनंती शेतकरी करीत आहे.
प्रतिनिधी ::प्रशांत नाईक धामणगांव रेल्वे