Home विदर्भ मोबाईल टावरच्या बॅटर्या चोरी करणारा चोरटा गजाआड

मोबाईल टावरच्या बॅटर्या चोरी करणारा चोरटा गजाआड

185

६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

यवतमाळ जिल्ह्यातील तीन चोरीचे गुन्हे आणले उघडकीस , ” स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही”

रवि माळवी

यवतमाळ , दि. २८ :- मोबाईल टावरच्या बॅटर्या चोरी करुन पांढर्या रंगाच्या टाटा सुमो मधून भंगार विक्रीच्या दुकानामध्ये विक्री करण्याकरीता घेवून जात असलेल्या चोरटयास यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आर्णी ते महागांव व दिग्रस टि पॉईन्ट जवळ सापळा रचून अटक केली. पोलीसांनी ही कार्यवाही दिनांक २७ जानेवारी रोजी केली.
शेख इमरान शेख ईसमाईल रा.मुबारक नगर आर्णी, शेख आसिफ व शेख जुबेर दोन्ही. रा. आर्णी असे पोलीसांनी अटक केलेल्या चोरट्या आरोपींची नावे आहेत. मागील काही महीण्यांमध्ये यवतमाळ जिल्हा परिसरात मोबाईल टावरच्या बॅटर्या चोरीच्या घटणा वाढल्या होत्या. त्यामुळे पोलीस अधिक्षक एम.राज कुमार यांनी सदर चोर्या तात्काळ उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांना आदेशीत करुन विशेष पथक स्थापन करण्याचया सुचना दिल्या होत्या त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पोलस उपनिरीक्षक निलेश शेळके व श्रीकांत जिंदमवार यांचे पथकातील कर्मचारी यांचे विशेष पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता स्थापन करण्यात आले होते. सदर पथकाने यापुर्वीसुध्दा मोबाईल टावरच्या बॅटर्या चोरी करणारी टोळी गजाआड करुन १० चोरीचे गुन्हे उघडकीस आणले होते.
पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके व श्रीकांत जिंदमवार यांचे पथक सदर आोपीतांचा माग काढत असतांना दिनांक २७ जानेवारी रोजी पथकास आरोपी शेख इमरान शेख ईसमाईल हा चोरीच्या मोबाईल टावर बॅटर्या घेवून टाटा सेमो गाडीने दिग्रस ते आर्णी रोडवर येणार असल्याचे खात्रीलायक माहीती वरुन आर्णी ते महागांव व दिग्रस टि पॉईन्ट जवळ सापळा रचून पांढर्या रंगाची टाटा सुमो वाहन थांबवून वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनामध्ये मोबाई टावर चोरीच्या बॅटर्या मिळून आल्या. चोरट्यास काल रात्री ग्राम डेहणी येथील टावर बॅटरी चोरीच्या प्रयत्न बद्दल विचारपुस केली असता त्याने सांगीतले की काल रात्री सोबत शेख आसिफ व शेख जुबेर देान्ही रा. आर्णी असे तिघेजन ग्राम डेहणी येथील मोबाईल टावरच्या बटर्या चोरण्याचा प्रयत्न केला परंतु आलाराम वाजल्यानेचोरी करता आली नाही, असे चोरट्यांनी सांगीतले. तसेच यापुर्वी ग्राम येरमल हेटी व ग्राम सदोबा सावळी येथुन प्रत्येकी २४ नगर अशा ४८ नग बॅटर्या चोरी केल्या व त्यातील ४६ नगर बॅटर्या आर्णी येथील शेख अहेमद शेख सादीक रा.आर्णी याचे भंगार दुकानावर विकल्याचे सांगीतले. वरील गुन्ह्यामध्ये सोबत शेख आसिफ व शेख जुबेर होते व गुन्ह्यात पांढर्या रंगाची सुमो गाडी वापरल्याचे सांगीतले. त्यावरुन अधिकचा तपास सुरु असून पुढील तपासकामी आरोपी व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकुण ६ लाख १० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आर्णी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक नुरुल हसन, यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर, पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, गजानन डोंगरे, गोपाल वास्टर, पंकज पातुरकर, मुन्ना आडे, कविश पाळेकर, किशोर झेंडेकर, मो.ताज, नागेश वास्टर व पंकज बेले सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली.