Home यवतमाळ लोखो रूपयाचे ‌तुप , खवा चोरणारे नेटवर्क यवतमाळ शहरात…!

लोखो रूपयाचे ‌तुप , खवा चोरणारे नेटवर्क यवतमाळ शहरात…!

704

 

यवतमाळ , दि. १५ :- यवतमाळ शहरालगत असलेल्या लोहारा मधील अतिरीक्त एमआयडीसी भोयर , परिसरात एक खासगी दूध डेअरी आहे . या डेअरीमध्ये खवा , तूप व दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यात येते . गेल्या काही दिवसापासून कच्च्या मालापासून तयार होणार्या मालामध्ये तफावत आढळून येत असल्याचे दुध डेअरीच्या संचालकाच्या लक्षात आले . त्यानंतर संचालकाने लक्ष ठेवणे सुरु ठेवल्याने कारखाण्याच्या जुन्या गेटवरुन डेअरीतीलच कामगार चोरी करत असल्याचे लक्षात आले . नोव्हेंबर व डिसेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार असून , यामध्ये सुमारे ४० ते ५० लाख रुपये किंमतीचा खवा व तूप चोरी गेल्याची माहिती आहे .

चोरी करणारे कामगार हे शहरातील पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचा – यांच्या खोलीवर वास्तव्यास आहे . चोरी केलेले तूप व खवा हे पोलीस कर्मचा – यांच्या खोलीवर ठेवत होते .

त्या ठिकाणावरून “खाकी” च्या मदतीने चोरीचे दम – दार व जोमात असे नेटवर्क सुरु असल्याची खमंग चर्चा आहे . चोरी केलेला तूप व खवा पिंपळगाव , वटबोरी येथील व व्यावसायीकाला विकल्याची चर्चा आहे . या घटनेची चर्चा यवतमाळ शहरात रंगत आहे . दुध डेअरी संचालकांनी या प्रकरणाची माहिती लोहारा पोलिसांसह शहर पोलिसांना दिली आहे . लोहारा पोलिसांनी दोन्ही कामगारांची चौकशी सुरु केल्याची माहिती आहे .