Home सातारा स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेशी बेईमानी केली नाही ,आलेल्या संकटांना सामोरे जाण्यास मी समर्थ...

स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेशी बेईमानी केली नाही ,आलेल्या संकटांना सामोरे जाण्यास मी समर्थ आहे – डॉ.दिलीपराव येळगावकर मायणी,फुलेनगर याठिकाणी विविध विकास कामे उद्घाटन कार्यक्रम संपन्न

477

 

मायणी – सतीश डोंगरे
आयुष्यभर जनतेसाठी पाण्याच्या प्रश्नी झगडलो आहे, कोणताही स्वार्थ न ठेवता ,येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मात करून सत्तेसाठी कधी मी लाचार बनलो नाही. यशोदीपविषयी अपप्रचार करणाऱ्या विरोधकांनी त्याविषयी काळजी करू नये .स्वतः राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याची शिडी वापरून पुन्हा त्या शिडीला फेकून देणाऱ्या स्वार्थी लोकांनी स्वतःचा विचार करावा. नेता संघटनेच्या जीवावर मोठा होतो. स्वतःच्या किंवा पैशाच्या जीवावर होत नाही.


असा घणाघात माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांनी विरोधकांवर केला. तर फुलेनगर याठिकाणी आयोजित जोतिबा मंदिर सभामंडप भूमिपूजन व व्यायामशाळा व साहित्य लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते.
या कार्यक्रमास हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजित देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई,मेडिकल कॉलेजचे माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख ,खटाव माण साखर कारखान्याच्या संचालिका प्रितीताई घार्गे,शिवसेनेचे नेते सचिन भिसे,युवा नेते सरपंच सचिन गुदगे,उपसरपंच जगन्नाथ भिसे, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ माने ,माजी उपसरपंच सुरज पाटील, विजय कवडे,जगन्नाथ देशमुख, संजय गुदगे, मानसिंग देशमुख, रघुनाथ माने ,आप्पासो भिसे ,अंकुश भिसे,सुरज भिसे,जालिंदर माळी, मोहन दगडे, शहाजी माने, तुषार भिसे, दत्तात्रेय काबुगडे ,सोमनाथ माळी ,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. येळगावकर पुढे म्हणाले,या भागातील टेंभू ,उरमोडी ,तारळी,जिहे-कटापूर या योजना पूर्णत्वास केल्यामुळे आता भागच्या दुष्काळी भागामध्ये आज आर्थिक सुबत्ता देणारे उसाचे पीक शेतकरी घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करू लागला आहे. नुकतीच टेंभू योजना पूर्णत्वास गेली असून यातून १६ गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे परंतु जिल्हा परिषदेची उदासीनता व या भागातील अकार्यक्षम लोकप्रतिनिधी यांच्यामुळे या गावांना या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.
सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा बँकेचे नूतन उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई ,वडूज नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक अभय देशमुख ,निवृत्त ग्रामसेवक अधिकारी तुकाराम खाडे यांच्याबरोबर अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजित देशमुख म्हणाले की, व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर प्रमुख नेते यांचे पक्ष जरी वेगळे असले तरी आमचं ठरलंय या टीमच्या माध्यमातून खटाव माणच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या साठी आम्ही सर्वजण एक दिलाने काम करीत राहणार आहोत.
यावेळी सातारा जिल्ह्याचे अनिल देसाई म्हणाले, हजारो कोटीची आर्थिक उलाढाल असलेली सातारा जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असलेली सातारा जिल्हा बँक सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. सध्याचे शिवसेना ,काँग्रेस ,भाजपा व इतर पक्षांची मिळून असलेलेले हे व्यासपीठ हेच अधोरेखित करते की,यापुढेही जनतेच्या सर्वांगीण विकासाची डॉ.येळगावकर यांच्या नेतृत्वात आम्ही काम करणार आहोत. कोणताही दुजाभाव न करता जिल्हा बँकेच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी व्यवसायिक यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देण्यासाठी पारदर्शक काम करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन.
यावेळी सरपंच सचिन गुदगे म्हणाले ,विरोधकांनी ज्योतिबा मंदिराचा सभामंडप राजकीय आकसापोटी इतरस्त्र नेला.अशाप्रकारे नागरिकांच्यावर विरोधकांच्या कडून अन्याय केला जात आहे .आम्ही करीत असलेल्या कामाविषयी चुकीची अपप्रचार केला जात आहे.सध्या व्यायाम शाळेमध्ये आणलेले साहित्य जिल्हा क्रीडा विभागाकडून मंजूर करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आज ते पूर्ण केले आहे. या गावातील फुलेनगर,इंदिरानगर,रामोशीवस्ती हा भाग विकासापासून आजही वंचित आहे. याभागातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जाहीरनाम्यातील कामे पूर्ण केली आहेत. किंबहुना त्यापेक्षाही जास्त काम आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत. लवकरच कोट्यवधींचा आराखडा असणारी २४×७ ही पेयजल योजना आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजाराम कचरे यांनी केले.

फोटो ओळी- विविध विकासकामे भूमिपूजन प्रसंगी जोतिबा मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन करताना डॉ.दिलीपराव येळगावकर,रणजीतभैय्या देशमुख,अनिल देसाई ,आप्पासाहेब देशमुख ,सचिन गुदगे व इतर मान्यवर….