Home वाशिम गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात वाशिम पोलीस दल तत्पर

गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात वाशिम पोलीस दल तत्पर

100

CCTNS च्या माध्यमातून ठेवला जातो गुन्हेगारांचा लेखाजोखा

वाशिम:-पोलीस विभागाचे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने(एनसीआरबी)
देशभरात सीसीटीएनएस यंत्रणा अंमलात आणली. सीसीटीएनएसची अंमलबजावणी व त्याच्या
हाताळणीत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असून हि महाराष्ट्र पोलीस दलाकरीता अभिमानाची बाब आहे. त्यामध्ये वाशिम जिल्हा पोलीस दल विसाव्या क्रमांकावर आहे.
वाशिम जिल्ह्यातील १३ पोलीस स्टेशन, ०३ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये व पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम,अपर पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम व नियंत्रण कक्ष, वाशिम येथे प्रत्येकी एक प्रमाणे अशा एकूण १९ ठिकाणी सीसीटीएनएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या
आहेत. पोलीस ठाण्यांचे अहवाल, गुन्हेगार, गुन्ह्यांची नोंद, इत्यादी माहिती पूर्वी रजिस्टरमध्ये लिखित
स्वरुपात नोंद असायची. पण पोलीस ठाण्यातील व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी एनसीआरबीने देशात
आयसीजेएस व सीसीटीएनएस हि यंत्रणा लागू केली. याअंतर्गत पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे,
अभिलेखावरील गुन्हेगार यांची माहिती ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पोलीस अधिक्षक
श्री.बच्चन सिंह(IPS) यांच्या नेतृत्वाखाली १३ पोलीस ठाण्यात नोंदविलेले एकूण 8 हजार ५६९ गुन्हे
ऑनलाईन करण्यात आले आहेत. महिलांविषयक गुन्हे वगळता ते सर्व FIR कुणीही ऑनलाईन पाहू
शकतो. वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय अंतर्गत तब्बल १९ ठिकाणी सीसीटीएनएस यंत्रणा
कार्यान्वित करण्यात आली असून महिन्याकाठी होणाऱ्या सीसीटीएनएस प्रणालीच्या मूल्यमापनात वाशिम जिल्हा पोलीस दलाला १७२ गुणांपैकी १३५ गुण प्राप्त झाले आहे.
पोलीस तपासामध्ये मदतीसाठी सुरु केलेल्या क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (सीसीटीएनएस) वापराबाबत महाराष्ट्र राज्याला देशातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.
विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासामधील गुन्हे प्रगटीकरण, गुन्ह्यांचे पर्यवेक्षण, गुन्हे प्रतिबंध करणे
यासाठी या प्रणालीची मदत होते. या प्रणालीमध्ये देशपातळीवरील गुन्हे व गुन्हेगारांची माहिती, गुन्हे
प्रगटीकरण, गुन्हेगारांची कार्यपद्धतीप्रमाणे शोध, शस्त्र परवाना तसेच तपासात गुन्ह्यांच्या सद्यस्थिती हि माहिती अद्ययावत करण्यात येते. गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई, पारपत्र, वाहनांबाबत पोलीस रेकॉर्डवरील
माहितीची पडताळणी अशा माहितीचाही समावेश या प्रणालीमध्ये आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206