शेवटी २२ तारखेला पोलीस अधिक्षक साहेबांकडे तक्रार दाखल…!
यवतमाळ दि. २३ सन १९५९ पासून कुळ लागलेली शेती कसत असलेल्या एका आदिवासी शेतकऱ्याला मुळ मालक असलेल्या कुटुंबातील ( १ ) प्रकाश कृष्णराव देशमुख ५८ , ( २ ) मंदार प्रकाश देशमुख ३८ , ( ३ ) गजू कुटे ४८ ( दिवानजी ) जळका या तिघांनी ताबा सोडण्याची धमकी दिली आहे . ताबा न सोडल्यास सर्व कुटुंबाला शेतातच गाडण्याचा सज्जड दमही दिला आहे . या भितीने गरीब आदिवासी कुटुंब धास्तावले आहे . सदर गैरअर्जदार प्रकाश देशमुख व मुलगा मंदार प्रकाश देशमुख यांनी सदर शेताचा सौदा मागील दोन वर्षापुर्वी तेलंगाना येथील इसमासी एकूण ६१ एकर ( २४.४८ हेक्टर ) जमीनीचा सौदा प्रती एकर १ लाख ९ ० हजार रुपये या दराने केला असून त्यापैकी ३३ लाख रुपये प्रकाश देशमुख यांनी दोन वर्षापूर्वीच अॅडव्हांस घेतला आहे . त्यामुळे तेलंगाना वाल्यांनी शेत खरेदी करण्यासाठी तगादा लावला असल्याने शेत खाली करण्यासाठी गैरअर्जदार गेले होते . या शेतात दिवान्या बालू कोलाम व श्रीधर कुळकर्णी या दोघांचे कुळ सन १९५९ लागलेले आहे . यांच्या न पच्छात प्रकाश देशमुख हे शेत विक्री करून देण्याच्या तयारीत आहे . तक्रारदार नारायण तुळशीराम खोरदे ( कोलाम ) रा . वरना ता . राळेगांव सदर शेतकरी राळेगांव पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरीता दि . १६/२/२०२२ व दि . १७ / २ / २०२२ रोजी गेले असता तक्रार घेण्यास नकार दिला असता दुसरे दिवशी शेतकऱ्यांनी राळेगांव येथील वकीलाकडे जावून तक्रार लिहून घेतली व पुन्हा दि . १८/२/२०२२ रोजी पोलीस स्टेशन राळेगांव येथे गेले असता तेथील पोलीस जमादाराने तक्रार लिहण्यास सुरुवात करून दोन – तीन लाईन लिहील्या व त्या कोन्या अर्जावर अर्जदारांचे अंगठे घेतलेले आहेत वरीष्टास सांगीतले असता तेथील पी . एस . आय . व ठाणेदार संजय चोबे यांनी गैरअर्जदारास फोन केला व त्यास पोलीस स्टेशनला येण्यास सांगीतले . व या शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्यास सांगितले . दुसरे दिवशी पुन्हा राळेगांव पोलीस स्टेशनला गेले असता परत गैरअर्जदारास ठाणेदारांनी फोन केला व अर्जदारा समोरच सांगीतले की तुमचे जमत असल्यास आज या नाहीतर उद्या या असे म्हणून पुन्हा या गरीब आदिवासी कोलाम शेतकऱ्यांना परत केले . यांचेशी चर्चेतच चोबे असे म्हणाले तुम्ही देशमुख यांची तक्रार करण्या ऐवजी ज्यांनी ( तेलंगाना ) वाल्यांनी शेती विकत घेतली आहे त्यांची तक्रार करा . असे बोलले असता शेतकरी कुटुंब म्हणाले की तो इसम आम्हाला काहीही बोलला नाही तर त्याची तक्रार आम्ही का करु . ज्यांनी प्रकाश देशमुख सोबत शेतीचा सौदा केला त्या तेलंगाना वाल्याची तक्रार करण्यास सांगण्याचा ठाणेदार चोबे यांचा उद्देश काय असावा . सदर शेतकरी हे शेत सन १९५९ पासून तक्रार कर्त्यांचे आजोबा , वडील व नंतर वारसदार या नात्याने तक्रारदार नारायण तुळशीराम खोरदे ( कोलाम ) हे या शेतीची वहीवाट करीत आहेत .
या शेतजमिनीवरच त्ययांचा उदरनिर्वाह असून हे शेत कुळ कायद्यानुसार खरेदी करून मिळावी यासाठी नारायण खोरदे यांनी सन २०१७ मध्ये तहसिलदार राळेगांव यांचेकडे अर्ज सुध्दा केला असून तहसिल मधील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून प्रकाश देशमुख त्यामध्ये अडंगा निर्मान करीत असून या शेतकऱ्यांपर्यंत तहसिल कार्यालयातून निघणाऱ्या नोटीस या आदिवासी कुटूंबाला मिळू नयू म्हणून तहसिल कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना हातीशी धरून या शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत .
दि . २२/२/२०२२ रोजी मा . पोलीस अधिक्षक साहेब यांची भेट घेतली असता साहेबंशी आश्वासन दिले की मी या आदिवासी शेतकऱ्यांना नियमानुसार न्याय मिळवून देण्याचा कसोसीने प्रयत्न करतो व कार्यवाही करतो असे आश्वासन पोलीस अधिक्षक साहेबांनी दिले आहे.