रावेर ( शेख शरीफ)
समाजाने दखल घेत दिलेला पुरस्कार हा जीवनात केलेल्या कार्याची पावती असते. अशा पुरस्कारामुळे इतरांना प्रेरणा तर स्वतःसाठी उर्जा मिळते असे प्रतिपादन माजी आमदार अरुण पाटील यांनी केले. कृषीसेवकतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
येथील श्रीराम मॅक्रो व्हिजन स्कुलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, केळीतज्ज्ञ डॉ के बी पाटील, नागपूरचे राष्ट्रीय कृषी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन गिरोळकर, अंनत बागुल, तहसीलदार उषाराणी देवगुणे, उद्योजक डॉ प्रशांत सरोदे, भाजता किसान मोर्चाचे संपर्क प्रमुख सुरेश धनके, जि प सदस्य नंदकिशोर महाजन, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, राष्टवादीचे सोपान पाटील, केळी कामगार नेते दिलीप कांबळे, ड्रीप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जळगाव ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीईओ सी एस पाटील, दीपक कापोटे प स सदस्य जितू पाटील उपस्थित होते.
माजी आमदार पाटील पुढे म्हणाले कि, सर्वच क्षेत्रात मन सन्मान होत असतात. परंतु शेतकऱ्यांचा मान सन्मान करण्याचा पायंडा कृषीसेवकने सुरु ठेवला आहे. कोरोना काळात देशातील सर्व उद्योग बंद पडले असताना केवळ शेती उद्योगाने अर्थचक्र सुरळीत सुरु ठेवले होते. शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणी दूर कारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत . तसेच नुकसानीची मदत देताना कमाल क्षेत्राची मर्यादा काढून लागवडीच्या क्षेत्राला मदत द्यावी. शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयन्त करावेत असे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी खासदार रक्षा खडसे , के बी पाटील, व गजानन गिरोळकर, उत्तम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पुरस्कारार्थींच्या कार्याचा आढावा असलेल्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सुत्रसंचलन ज्योती राणे यांनी तर प्रास्तविक व आभार कृष्णा पाटील यांनी व्यक्त केले. ३५ पुरस्कारार्थींचा झाला सन्मान
यावेळी शेतकरी, युवा शेतकरी, शात्रज्ञ ,कृषी तज्ज्ञ, शेतकरी मित्र, कृषी उद्योजक, व शेतकरी मित्र या गटातून निवड झालेल्या एकूण ३५ पुरस्कारार्थींचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.