दुसऱ्याची बायको घेऊन ठाणेदार फरार
मनिष गुडधे
अमरावती – ठाणेदाराने आपल्या बायकोला पळवून नेले, असा खळबळजनक आरोप इंजिनिअर नवऱ्याने केला आहे. ठाणेदाराच्या नावाने आपल्याला अज्ञात व्यक्तीने धमकावल्याचा दावाही पतीने केला आहे. अमरावती जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. येवदा येथील ठाणेदार अमूल बच्छाव यांनी आपल्या पत्नीला पळवून नेले, असा आरोप पीडित पतीने केला आहे. पदाचा गैरवापर करुन त्याने बऱ्याच महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोपही त्याने केला आहे. बायकोशी घटस्फोट घेतल्यानंतर आपण पुनर्विवाह केला होता. मात्र दुसऱ्यांदा झालेल्या विवाहानंतर अवघ्या दोन दिवसात पत्नी बेपत्ता झाल्याने ठाणेदारानेच आपल्या बायकोला पळवल्याचा संशय पतीने व्यक्त केला आहे. .काय आहे आपल्या पत्नीला अमरावती जिल्ह्यातील येवदा येथील ठाणेदार अमूल बच्छाव यांनी पळवून नेल्याचा खळबळजनक आरोप अकोला जिल्ह्यातील एका अभियंता पतीने केला आहे.? याबाबत नोव्हेंबर 2021 मध्येच तक्रार केली होती. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी बुलडाणा येथे ठाणेदार अमूल बच्छाव यांच्या नावाचा संदर्भ देत एका अज्ञात व्यक्तीने आपल्याला धमकावले. या संपूर्ण प्रकरणाबाबत अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवली आहे. कुटुंबीयांच्या जिवाला धोका. बच्छाव यांच्याकडून आपल्यासह आपल्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप दिव्यकुमार शर्मा या अभियंता पतीने पत्रकार परिषदेत केला आहे. ठाणेदार अमूल बच्छाव यांना तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. घटस्फोटानंतर पुन्हा विवाहपतीच्या आरोपानुसार बच्छाव यांनी पदाचा गैरवापर करुन बऱ्याच महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. बच्छाव यांनी आपल्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध प्रस्थापित केल्याने घटस्फोट घेतला होता. मात्र, कुटुंबीय आणि मुलाच्या काळजीपोटी आपण सारे काही पचवून तिच्याशी 19 नोव्हेंबर 2021 रोजी पुनर्विवाह केला, असं पतीने सांगितलं.दुसऱ्यांदा झालेल्या लग्नाच्या दोनच दिवसांनंतर म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी ती बेपत्ता झाली. तिला बच्छाव यांनीच पळवून नेल्याचा दाट संशय आपल्याला असल्याचा दावा देखील अभियंत्याने केला आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी या बाबत तपास करत आहेत.