सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. २८ :- जिल्ह्यातील नागपुर मार्गावरील सेलु नजिकच्या रमणा पाटी सम्रुध्दी रोड क्रासिंग जवळ दुचाकी वाहन क्र.MH31 BQ 9161 ने दोघे मित्र बोरधरण येथून
वर्धेच्या दिशेने भरधाव वेगाने जात असता दुचाकी वाहनाचा मागचा चाक पंक्चर झाल्याने मागाहून येणाऱ्या ट्रक क्र. MH40 AK 8393 ने जबर धडक दिल्याने मागे बसून असलेला साहिल खाली पडताच त्याचे अंगावरुन ट्रक गेल्याने सुमित ऊर्फ साहिल संजय डांगे , राहणार बहूजन नगर , वार्ड क्र. २, सिंदी (मेघे),वर्धा याचा घटनास्थळी करुण म्रुत्यू झाला.तर यात दुचाकी वाहन चालक व्रुषभ हरिभाऊ कराडे,वय २० वर्ष , राहणार सिंदी (मेघे),वर्धा हा गंभीर जखमी झाला असून त्याचेवर उपचार सुरु आहे.सदर घटना दुपारी १.३० वाजताचे सुमारास घडली.
नागपुर जिल्ह्यातील उमरेड येथून मित्राच्या साक्षगंधाचे कार्यक्रम आटोपून प्रशांत काशीनपुरे वर्धा, होमदेव गोमासे,किशोर गोमासे रा.आंजी मोठी व किशोर निमजे हे चौघेही अल्टो कार क्र.MH32-AN 0026 ने निघाले. ते सर्व रस्त्यात पडत असलेल्या केळझर नजिकच्या न्यू जलसा ढाब्यावर चहा- पाणी नाष्टा करण्यासाठी गाडी बाजूला उभी करुन आत गेले. नाष्ट्याचा कार्यक्रम आटोपल्यावर प्रशांत हा बिसलेरी बॉटल घेवून कारचे दिशेने एकटाच पुढे निघाला असता डोळा लवते व लवते वर्धेहून नागपुर चे दिशेने जाणारी पांढर्या रंगाची भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जबर धडक दिल्याने प्रशांत रामदास काशीनपुरे हा जवळपास १०० फूट दूर फुटबॉल सारखा फेकल्या गेला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच म्रुत्यू झाला.सदर घटना ही रात्रीचे ९ वाजताचे दरम्यान घडली.
हिंगणी येथून रात्रीचे सुमारास सेलडोह नजिकच्या पुनर्वसन वस्तीकडे जाण्यास दुचाकी वाहन क्र.MH40-BS 2698 ने निघालेल्या युवकाचा हिंगणीपासून थोड्या अंतरावर असलेल्या नाल्यावर वाहनावरुन ताबा सुटताच तो अनियंत्रित वाहनासह नाल्यातील पाण्यात जावून पडला.त्याच स्थितीत तो रात्रभर पडून राहिल्याने त्याचा घटनास्थळीच म्रुत्यू झाला. खापरी येथील शेतकरी आज पहाटे शेतात जाण्यासाठी निघाले असता त्यांना नाल्यात युवकाचे प्रेत आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली. सदर माहिती शेतकऱ्यांनी खापरी गावचे पोलिस पाटील व सरपंच प्रमोद गव्हाळे यांना दिली.म्रुतक यु्काची ओळख पटली असून तो नजिकच्या ब्राम्हणी गावातील प्रशांत हरिभाऊ कुकुड्डे असून कबड्डीचा उत्तम खेळाडू होता.