शरीफ शेख – रावेर
जळगाव , दि. २८ :- मुस्लिम मंच आयोजित साखळी उपोषणाचा मंगळवारी ३३ वा दिवस मासूम वाड़ी परिसरातील महिला व पुरुषांनी एकत्रित बसून अत्यंत रागाने आपला विरोध दर्शविला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाची सुरुवात हाफिज वसीम पटेल यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली यावेळी मुफ़्ती अबुजर आणि हामिद जनाब,फारुख शेख, शरीफ शाह, करीम सालार, सुफ़िया खत्री, गफ्फार मलीक, अब्दुल बारी (नंदुरबार) यांनी मार्गदर्शन केले. अकील खान व अलफैज़ पटेल यांनी नारे व गीत सादर केले.
उप जिल्हाधिकारी यांना निवेदन
हाफिज वसीम पटेल, मोहम्मद इक्बाल अहमद, महेमुद आमद, सय्यद मुनीर, जावेद खान,यूसुफ शाह, सुफिया खत्री, मुमताज बी, रजीयाबी व सुप्रिया खत्री यांनी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारते यांना निवेदन दिले.