जळगाव प्रतिनिधी = जळगाव तालुक्यातील लमांजन ग्रामपंचयतीचे 3 सदस्य निवडून आले होते. शासकीय कराच्या रकमेचा घरपट्टी व पाणीपट्टी चा भरणा मुदतीत केला नसल्याने लमांजन (ता.जळगाव) येथील ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांना अपात्र करण्याबाबतची मागणी येथील रहिवासी प्रदिप कैलास पाटील व गोरख धोंडु पाटील यांनी जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जळगाव उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना दिलेल्या तक्रारी निवेदनातून केली आहे
जळगाव तालुक्यातील लमांजन ग्रामपंचयतीचे 3 सदस्य निवडून आले होते. या सदस्यांनी मुदतीमध्ये शासकीय कराच्या रकमेचा घरपट्टी व पाणीपट्टी चा भरणा मुदतीत केलेलाच नाही त्यामुळे सदस्यांना मुदतीत भरणा केला नसल्याने 3 सदस्यांना अपात्र करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
दिलेल्या तक्रारीची त्वरीत दखल घेऊन या सदस्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 14 (ह ) प्रमाणे तक्रार दाखल घेऊन निवडून आलेल्या लोकप्रतीनिधींचे कराचा भरणा करणे आद्यकर्तव्य असतांनाही आपल्या कर्तव्यात कसुर केला आहे व लोकप्रतिनिधी यांच्याकडून कराच्या रकमा उशिरा भरणे व भरण्यास टाळटाळ करणे अपेक्षित नसुन कर भरणा न केल्यामुळे 3 सदस्यांना अपात्र घोषित करण्यात यावे अशी मागणी प्रदिप कैलास पाटील व गोरख धोंडु पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे.
बाईट प्रदिप कैलास पाटील
लमांजन ता. जळगाव