Home यवतमाळ डॉ. अंजली गवार्ले मेडिक्वीन-2022 ने सन्मानीत

डॉ. अंजली गवार्ले मेडिक्वीन-2022 ने सन्मानीत

985

यवतमाळ – ठाणे येथील क्विनकेअर हॉस्पिटल व मेडिक्विन मेडिको पेजेंटच्या वतीने जागतिक महिलादिनी महिलांसाठी घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत यवतमाळच्या प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ व शल्यचिकित्सक व गवार्ले हॉस्पीटलच्या संचालिका डॉ. अंजली गवार्ले यांना ’मेडिक्विन मिस्ट्रेस इन्स्पायरेशन 2022’ने सन्मानित करण्यात आले.
त्यांना मेडिक्विन मेडिको पेजेंटच्या संचालिका व 2018 मध्ये मिस्ट्रेस इंडियाचा किताब पटकाविणार्‍या डॉ. प्रेरणा बेरी व आयुर्वेद आणि पंचकर्म सल्लागार, तसेच नृत्य परीक्षिका डॉ. प्राजक्ता शहा यांच्याहस्ते मुकुट प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. मेडिक्विन ही भारतातील पहिली मेडिको सौंदर्य स्पर्धा आहे. महिला डॉक्टर करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव यात केला जातो. महाराष्ट्रात ही स्पर्धा यंदा प्रथमच घेण्यात आली. मेडिक्विन ही केवळ सौंदर्य स्पर्धा नसून महिला डॉक्टर्स समाजासाठी देत असलेल्या योगदानाची, त्या करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेतली जाते. मेडिक्वीन पेटेंटच्या संचालिका उज्वला बदलापूरकर स्त्रीरोगतज्ञ ह्या परिक्षक म्हणून होत्या. डॉ. अंजली गवार्ले यांनी पटकाविलेल्या अतुलनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.