Home नांदेड माहूर भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना दिलेले सूचनापत्र जाळून केला आघाडी सरकारचा निषेध.

माहूर भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना दिलेले सूचनापत्र जाळून केला आघाडी सरकारचा निषेध.

583

 

प्रतिनिधी – मजहर शेख,

नांदेड/माहूर,दि : १३ :- महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्टवादी, शिवसेना यांची अभद्र युती होउन तूझ माझ जमेना तुझ्यावाचून करमेना या उक्तीप्रमाणे महा विकास आघाडी सरकार। स्थापन झाल्यापासून 100कोटीच्या वसूली प्रकरणी राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा ग्रुहमंत्री अनिल देशमुख, तर मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी देशाचा दुश्मन डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर जमीन खरेदी प्रकरणात आरोपी असलेले अल्पसख्यांक मंत्री नबाब मलीक हे तुरुंगाची हवा खात असून माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बदली प्रकरणात झालेला घोटाळा उघड करुन महाविकास आघाडी सरकारचे पातळ उघडे पाडले असल्याने मग. मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,मा.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ,गिरीष महाजन यांंचे विरोधात आघाडीतील काही मंत्री,अधिकारी,सरकारी वकील यांनी संंगणमताने खोटा गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचले होते ही बाब देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुराव्यानिशी उघड केल्याने महाविकास आघाडी सरकार हादरले होते याचा राग धरून वैफल्यग्रस्त आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांना फोनटॅपिंग प्रकरणात जुहू वांद्रे पोलीस स्टेनमध्ये जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्यासाठी सूचनापत्र (नोटीस )बजावली होती, या आघाडी सरकारच्या निंदनीय क्रुतिचा भारतिय जनता पक्षातर्फे पोलीसांनी दिलेल्या नोटीसीची होळी करून निषेध आंदोलनाचा इशारा देताच पोलीसांनी फडणवीस यांना भ्रमणध्वनी करुन आम्हीच जबाब नोंदवण्यासाठी आपल्या सागर बंगल्यावर येणार असून आपणास पोलीस स्टेशनमध्ये येण्याची गरज नाही असे कळविले असे असले तरी पक्षाच्या आदेशानुसार दिनांक 13 फेबूरवारी सकाळी 11वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत माहूर भाजपातर्फे नोटीसीचे दहन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.यावेळी तालूका अध्यक्ष अॅड दिनेश येउतकर, शहराध्यक्ष गोपू महामूने, जेष्ठ कार्यकर्ते विजय आमले, सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघमारे, नंदकुमार जोशी, तालूका सरचिटणीस अच्युत जोशी, संजय बनसोडे, संतोष तामखाने,सदानंद नागरगोजे, कैलास फड, अर्जुन मोहीते. यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.