Home अकोला दिंडी मार्ग साठी श्री भक्तांसह केले भीक मांगो आंदोलन…!

दिंडी मार्ग साठी श्री भक्तांसह केले भीक मांगो आंदोलन…!

109

 

अकोला / पारस –  गेल्या तीन वर्षापासून खोदलेल्या श्रीक्षेत्र शेगाव ते श्री शेत्र पंढरपूर या दिंडी मार्गावरील नागझरी ते शेगाव कसुरा निमकर्दा अकोला या वारी मार्गाची पूर्णता दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याच्या खोदकामामुळे या भागातील शेतकरी शेतमजूर व्यापारी नोकरदार शालेय विद्यार्थी दुग्ध व्यावसायिक व शेगाव येथे दर्शनासाठी नित्यनेमाने जाणारे हजारो भाविक त्रस्त झाले आहेत या मार्गासाठी अनेक वेळा आंदोलने केली तरीसुद्धा प्रशासन सुस्त पडलेल् आहे
गुरुवार एकादशी व रविवारी पायदळ जाणाऱ्या भाविकांची संख्या खूप असते यामध्ये अमरावती वाशिम हिंगोली जिल्ह्यातील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो हे भाविक पायदळ वारी करीत असताना डाबकी गावापासून धुळीचा जो त्रास होतो तो थेट संतनगरी शेगाव पर्यंत रस्ता खोदलेल्या स्थितीत असल्यामुळे पायी चालणे या मार्गावर कठीण झाले आहे वाहणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून धुळीचे लोट दिवसभर सुरू असतात दिंडी मार्गाचे बहुतांश काम इतर जिल्ह्यातील पूर्ण झाले असून या ठिकाणावरून संत गजानन महाराजांची पालखी सुरू होणार आहे त्या. शेगाव तीलच काम सध्या अपूर्णावस्थेत आहे जिल्ह्यातील एकमेव सत्ताधारी आमदार असलेले नितीन देशमुख यांच्या मतदारसंघातील हे काम असून हे काम एवढे वर्ष झाली तरी अपूर्ण का याबाबत सर्व नागरिकांन मध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे इतर धार्मिक प्रश्नांसाठी आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्ष भाजपा या बाबतीत मूग गिळून चुप का याबाबत ही अनेक तर्कवितर्क काढल्या जात आहेत सदर रस्त्याच्या कामास निधी कमी पडल्याचा कांगवा सध्या सगळीकडे सुरु असून या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी गोपाल पोहरे देवानंद साबळे यांचे नेतृत्वात या मार्गावर भीक मांगो आंदोलन राबविण्यात आले जमा झालेले पैसे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठविण्यात येणार आहे.
सदर आंदोलनामध्ये सरपंच सचिन जामोदे रविकांत इंगळे योगेश धोरण शाम तायडे हर्षल धांडे विजय इंगळे अजय निंबेकर सचिन रसाळ संजय मगर ऋषिकेश वानखडे रमेश पाकदाने गोपाल शेंडे सागर जामोदे महादेव वानखडे सागर निंबेकर अतुल रसाळ अशिष खेडकर उमेश निंबेकर इत्यादी सह पायदळ जाणाऱ्या भाविक भक्तांनी सहभाग घेतला.