प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड
नांदेड/माहूर, दि,१५ :- आ. भिमरावजी केराम यांच्या विकासनिधीतून अंजनखेड येथे १० लक्ष रूपयाच्या सभामंडपाचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून या समाजमंडपाचा उपयोग राजकारणासाठी नव्हे तर विद्यार्थी व नागरीकांसाठी बौद्धीक क्षमता वाढविण्यासाठी व्हावा असे प्रांजळ मत स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते यांनी यावेळी व्यक्त केले.
माहूर तालुक्यातील मौजे अंजनखेड येथे ग्रामस्थांसाठी सभामंडप व्हावा या ग्रामस्थांकडून होत होती. तथापि या मागणीच्या पार्श्वभुमिवर भारतीय जनता पक्षाचे किनवट माहूर विधानसभेचे आमदार भिमरावजी केराम यांच्या विकासनिधीतून १० लक्ष रुपये तातडीने मंजूर केले असून आज दि. १५ मार्च रोजी मौजे अंजनखेड येथे सामाजिक सभामंडपाचे भूमिपूजन सेवानिवृत्त अधिकारी अनिल पांडे यांच्यासह भिमरावजी केराम यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते, मनोहर श्यामशेट्टीवार, रामभाऊ वाघमारे, संदीप आडावे, प्रविण मारकवार, सुभाष रामजोग, भाजपा युवा मोर्चा माहुर तालुका सरचिटणीस आशिष अशोकराव आडावे, अनिल उडदवाड, कपिल उडदवाड, साईराम पडलवार, अनिकेत संगेवाड, वैभव सातव, सचिन खंदारकर, सुरज अब्बेन्नबोईनवाड, प्रज्वल सोनुले, गजानन उडदवाड, गजानन वानखेडे, सचिन वाघमारे, देवानंद पप्पलवाड, वैभव पडलवाड, सुदर्शन गाडे व गावक-यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले…
यावेळी होत असलेला सभामंडप उभारून येथे परिसर दुरुस्तीकरण व सुशोभीकरण करून या ठिकाणी विद्यार्थी अभ्यासिका तसेच वृद्ध नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प करून हे राजकारणासाठी नव्हे तर या मातीशी असलेली नाळ व सामाजिक बांधिलकी असल्याचे मत कुडमते यांनी व्यक्त केले. दरम्यान नवतरूणांनी व्यसनाधिनतेकडे न जाता त्यांची शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. यासाठी अधिकाधिक उपाययोजना करणार असल्याचेही मनोगत त्यांनी व्यक्त केले. विशेषत: अंजनखेड हे गाव आ. केराम यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते यांंचे गांव असल्याने गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून गावच्या विकासात हातभार लावण्यासाठी बांधिल असून यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी प्रकाश कुडमते यानी केले..