Home सातारा मायणीचे धार्मिक गतवैभव पुन्हा निर्माण करणार – मा. आ.डॉ. दिलीपराव येळगावकर

मायणीचे धार्मिक गतवैभव पुन्हा निर्माण करणार – मा. आ.डॉ. दिलीपराव येळगावकर

352

 

सतीश डोंगरे

मायणीचे धार्मिक गतवैभव पुन्हा निर्माण करणार असा दृढ निश्चय मा. आ.डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी केला. भारुडी भजन कार्यक्रमप्रसंगी जमलेल्या प्रेक्षकांसमोर मायणी येथे ते सद्गुरु यशवंत बाबा पुण्यतिथी व सद्गुरु सरुताई माऊलींच्या प्रकट दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी बनपुरी येथील भारुडी भजनी मंडळ तसेच सरुताई ट्रस्टचे सचिव रवींद्र शेठ बाबर, अभिजित येळगावकर,विलासराव सोमदे, नाना पुजारी,रामभाऊ देवकर,जालिंदर माळी, मानसिंग देशमुख,सोमनाथ माळी,राजाराम कचरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.येळगावकर म्हणाले,माझे वडील कै.बापूराव येळगावकर हे सद्गुरु यशवंत बाबांचे परमशिष्य होते.त्यांनी सद्गुरु यशवंत बाबांच्या यात्रेनिमित्त आपल्या घराजवळ भारुडी भजनाची परंपरा अखंड सुरु ठेवली होती. परंतु साधारणपणे ४० वर्षापासून या परंपरेत बाधा येऊ लागली. गेल्या २-३वर्षापासून कोरोनामुळे ही प्रथा (परंपरा) बंदच होती.परंतु या वर्षी ही परंपरा आम्ही पुन्हा अखंडपणे सुरु करत आहोत. दरम्यान,हा भारुडी भजनाचा कार्यक्रम सुरु असतानाच सदगुरु यशवंत बाबांची पालखी येळगावकर यांच्या दारात आली. सर्व येळगावकर कुटुंबियांनी पालखीचे दर्शन घेतले. बनपुरीच्या भारुडी भजनी कलाकारांनी अतिशय सुंदर पद्धतीने भारुड सादरीकरण केले. त्यांचा यथोचित सत्कार डॉ.येळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.विलासराव सोमदे व जालिंदर माळी यांनी प्रत्येकी पाचशे रुपये भरुडी कलाकारांना बक्षीस म्हणून दिले. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर पहाटे ४ वाजता प्रकट दिनानिमित्त सद्गुरु सरुताई माऊलींची आरती करण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजता डॉ. सौ.उर्मिला येळगावकर व मा. आ.डॉ. दिलीपराव येळगावकर,अभिजित येळगावकर,सौ.रेणू येळगावकर, संजय गुदगे,सौ.पल्लवी गुदगे यांच्या हस्ते ताईंची महाआरती करण्यात आली.त्याअगोदर ह.भ.प.डांगे महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी ट्रस्टचे सचिव रवींद्रशेठ बाबर,सर्व संचालक व भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.