इकबाल शैख – वर्धा
क्रेशर मशीनवर भरते जुगारींची यात्रा; पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष.
कारंजा घाडगे : कायद्याचे राज्य आहे किंवा नाही, अशी परिस्थिती दाखविणारे कारंजा घाडगे तालुक्यातील काही भागात आढळून आले. खुलेआम राजनी येथे क्रेशर मशीनवर जुगार अड्डा सुरू असून येथे जुगारींची यात्राच भरत असल्याचे चित्र असल्याची ओरड नागरिकांना मध्ये दिसत आहे.
एका विच्चाविभुशीत व्यक्तीच्या क्रेशर मशीन परिसरात हा जुगार सुरु असल्याची ओरड ऐकायला मिळत आहे हा जुगार क्रेशर मशीन परिसरातील एका मोकड्या जागेवर सुरु असल्याचे समजते इथे खेळायला येणारे जुगारी जुगार खेळण्याकरिता इतर ठीकानावरून येतात.
कारंजा पोलीस ठाणेच्या हद्दीत येणाऱ्या या राजनी परिसरातील हा जुगार कोण्याही अधिकाऱ्याला दिसत का नाही किंवा या जुगारावर अर्थ पूर्ण दुर्लक्ष केला जात आहे हा संशोधनचा विषय आहे.