Home यवतमाळ समता पर्व प्रतिष्ठान २०२२ तर्फे गझल मैफिल

समता पर्व प्रतिष्ठान २०२२ तर्फे गझल मैफिल

290

 

आज यवतमाळ शहरात बहारदार गझल मुशायरा व शाम-ए-गझल

गेल्या दीड दशकांपासून समता पर्वाच्या माध्यमातून महामानवांच्या विचारांची ज्योत अखंडपणे तेवत आहे.परिवर्तनाचा हा अखंड प्रवाह विविध कृतिशील उपक्रमांच्या माध्यमातून जनसामान्यांत दरवर्षी पोहचतो आहे. यावर्षी सुद्धा दिनांक ७ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
विदर्भातल्या मातीतल्या साहित्याने महापुरुषांची विचारधारा सर्वदूर पोहचवली आहे. याच अनुषंगाने समता पर्वातर्फे आज सायंकाळी 4 वाजता गझल मुशायऱ्याचे उद्घाटकिय सत्र असून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामीण रुग्णालय आर्णीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष पाटील तर विशेष उपस्थिती म्हणून डॉ.सुदर्शन कांबळे,डॉ रजनी सुदर्शन कांबळे,डॉ.सुमेध देवतळे व प्रमुख उपस्थिती म्हणून नवनाथ कोळपकर, सिद्धार्थ भवरे,विजय भवरे,राजेंद्र फाळके असणार आहेत. 5 ते 7 पर्यंतच्या गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष ख्यातनाम गझलकार किरणकुमार मडावी असून यात प्रमोद कांबळे,गजानन कावडे,अर्चना वासेकर,वैशाली कोठेकर,वृषाली मारतोडे,आनंद देवगडे,अतुलकुमार ढोणे,जयकुमार वानखेडे,अक्षय गहुकार,दुशांत शेळके,अनिमिष मिरासे,गिरीश खोब्रागडे यांचा सहभाग असणार आहे. सत्राचे निवेदन स्नेहल सोनटक्के करणार आहेत.आजच्या दिवसाचे विशेष आकर्षण असणारी शाम-ए-गझल मैफिलचे सादरीकरण सुप्रसिद्ध,ख्यातनाम गझल गायक तथा संगीतकार रुद्रकुमार व त्यांची टीम करणार आहे.सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मुशायरा व मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन समता पर्व प्रतिष्ठाण 2022 व कार्यक्रमाचे संयोजक असणाऱ्या रानभरारी गझलमंच तर्फे करण्यात येत आहे.