आर्णी – केळापूर विधानसभा अध्यक्ष स्वानंद चव्हाण…!
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी : आर्णी – केळापूर हा मतदारसंघ अनुसूचित जमाती साठी राखीव असुन मागील 35 वर्षापासुन या मतदारसंघात माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष अँड. शिवाजीराव मोघे हे प्रतिनिधित्व करत आहे. गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन स्विय सहाय्यक देवानंद पवार यांनी पक्ष विरोधी कारवाया व कांमे केल्यामुळे सर्वात अधिक वेळा निवडुन येणारे मोघे यांना पाठींबा न देता माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर, भाजपा आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचे सोबत छुपी युती करुन तसेच पक्षांतर्गत गट बाजी करुन विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत केली आहे. माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 1600 मतांनी पराभूत झाले होते. तसेच मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विरुद्ध अपक्ष निवडणूक लढवून काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. सहकार क्षेत्रातील चालू असलेल्या निवडणुकीत सुद्धा पवार हे माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर, भाजपाचे आमदार डाँ. संदीप धुर्वे यांच्या सोबत हात मिळवणी करुन पक्ष विरोधी कारवाया सुरू आहे. असा आरोप आर्णी केळापूरचे अध्यक्ष स्वानंद अशोक चव्हाण यांनी घाटंजी येथील विश्राम भवनावर आयोजित पत्र परिषदेत केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांच्या सोबत राहुन घाटंजी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता आपल्या मर्जीतल्या भाजपा कार्यकर्त्यांना घाटंजी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष पद नाना पटोले मार्फत दिले आहे. पवार हे गांवो गांवी दौरे करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मजबुत करण्याचे काम करत असल्याचा आरोप सुद्धा स्वानंद चव्हाण यांनी या वेळी केला आहे. काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून घाटंजी तालुक्यातील भाजपाचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतीला निधी मिळवुन देण्याचे काम पवार करित असून भांबोरा, पार्डी (नस्करी), पाटापांगरा, मानोली, जरंग, शिवणी, आंबेझरी, शिरोली आदीं गावांना भेटी देऊन भाजपा कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन काँग्रेस पक्ष विरोधी कारवाया करत आहे. तसेच काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचे काम प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार हे करीत आहे. देवानंद पवार हे माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर, भाजपाचे आमदार डाँ. संदीप धुर्वे यांच्या सोबत सोसायटीच्या निवडणुका लढवित असुन अनेक ठिकाणी सोसायट्या सुद्धा निवडुण आणल्याचा आरोप पत्र परिषदेत करण्यात आला आहे. सोसायटीच्या निवडणुकीत प्रामुख्याने शिवणी, मानोली, रामपुर, कोळी आदीं सोसायटीच्या निवडणुकीत सहभाग आहे. देवानंद पवार यांचे कडे किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असुन काँग्रेस पक्षासोबत पक्षांतर्गत गट बाजी करुन भाजपाला मदत करणे योग्य नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षातील विरोधी कारवाया करणार्या व भाजपा नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या व पक्ष विरोधी कारवाया करणार्या प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांची तात्काळ काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी करण्याची मागणी आर्णी – केळापूर विधानसभा अध्यक्ष स्वानंद अशोक चव्हाण यांनी पत्र परिषदेत केला आहे.