जालना-लक्ष्मण बिलोरे
ज्येष्ठ पत्रकार खा. संजय राऊत हे महाविकास आघाडीचे खरे शिल्पकार आहेत. एक ध्येयवादी पत्रकार काय करू शकतो याचे हे उदाहरण आहे. आणि तेही आपली पत्रकारिता कायम ठेवून संजय राऊत शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्याशीही अखेरपर्यँत प्रामाणिक राहिले. आणि सध्या ते एक मित्र म्हणून आणि कडवे शिवसैनिक , पत्रकार म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. हे सगळे आहेच पण मला नेहमी अप्रूप वाटते ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे. एकदा त्यांचा एखाद्या माणसावर जीव जडला कि त्याच्यासाठी वाट्टेल ते करायची त्यांची खासियत आहे. माणसं कमावणं हि त्यांच्यामध्ये असलेली उपजत कला आहे. आपल्या अवतीभवती त्यांनी प्रचंड मोठा गोतावळा जमा केला आहे आणि हिच त्यांची मोठी संपत्ती आहे. ज्याची ईडीच काय कोणतीही तपास यंत्रणा चौकशी करू शकत नाही 🙂 असे कोणतेही गाव नाही जिथे त्यांना मानणारी माणसे नाहीत. कोणतीही गोष्ट ठरवली कि , शरद पवार ते हमखास करतातच करतात…
आज हे सगळं लिहिण्याचं प्रयोजन असे कि , एक मित्र म्हणून शरद पवार थेट यांनी संजय राऊत यांचा विषय पंतप्रधान मोदींच्या समोर नेला. आणि एका पत्रकराविरुद्धची हि कुरापत बरी नाही असे मोदींना ठणकावून सांगितले. खरे तर या आधी स्वतः ते ईडीच्या चौकशीला सामोरे गेले आहेत. त्यांचे कुटुंबीय अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या भगिनींनाही तपास यंत्रणांनी सोडले नाही. त्यांच्या पक्षाचे दोन मंत्री सध्या अटकेत आहेत. छगन भुजबळही सगळे काही सोसून स्वतः बाहेर आले पण पवार यांच्या कुणाविषयीसुद्धा पंतप्रधानांना बोलले नाही पण जेंव्हा यात संजय राऊत भरडले जात आहेत हे त्यांनी पहिले तेंव्हा एका पत्रकारावर होत असलेला अन्याय त्यांना कदाचित सहन झाला नाही म्हणून त्यांनी थेट पंतप्रधानांना गाठले हि साधी गोष्ट नाही. खरे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख या नात्याने त्यांच्या बाजूने बोलले असते तर त्यात काहीही नवल नव्हते पण त्यांच्या आधी पवारांनी राऊत यांच्या बाजूने उभे राहणे हा शरद पवार यांचा मोठेपणा आहे. आणि विशेष म्हणजे कोण काय म्हणेल याची कोणतीही पर्वा न करता पवार पुढे आले हि गोष्ट नक्कीच मैत्रीची शान वाढवणारी आहे. नाही तर आज काल पत्रकारांच्या बाजूने कोण उभा राहतो. ज्यांना पत्रकारांनी मोठे केले असे कितीतरी नेते , कार्यकर्ते वेळ निघून गेल्यानंतर आपल्या मैत्रीची कधीही जाणीव ठेवत नाहीत. जेंव्हा एखादा पत्रकार त्यांच्या बाजूने त्यांना राजकारणात उभे करण्यासाठी आपली लेखणी वापरात असतो तोपर्यंतच अशा नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा त्याच्याशी राबता असतो आणि एकदा तो कार्यकर्ता पुढे नेता , मदार , खासदार , मंत्री झाल्यानंतर सर्व साळसूदपणे सर्व काही विसरून जातो … पण शेवटी मोठेपणा हा रक्तातच असावा लागतो हेच या निमित्ताने पवारांनी दाखवून दिले . सलाम या मैत्रीला आणि पवारांच्या मोठेपणाला…
बरं संजय राऊतही असा प्रामाणिक पत्रकार कि , समोरच्याने कितीही आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला तरीही “झुकेगा नही साला …” असे म्हणत न घाबरता आपल्या राजकीय शत्रूशी झुंजत आहेत. एक पत्रकार म्हणून संजय राऊत यांच्यासाठी हे दोन शब्द लिहिले नाही तर बरे होणार नाही … नाही तर एखाद्या पत्रकाराला सत्ताधाऱ्यांना शांत करणे अवघड नाही… लगे रहो संजय भाई
बाबा गाडे,
पत्रकार, औरंगाबाद
(यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)