Home बुलडाणा प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात

प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात

409

प्रतिनिधी:( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव राजा:-अंढेरा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशोर गीते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर किशोर गीते हे होते.
महात्मा ज्योतिबा फुले हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जाती गुरुजी समाज सुधारक आणि लेखक होते त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन जातीव्यवस्था आणि महिलांसाठी शिक्षण अशी अनेक सामाजिक कार्य केले दलित जातीतील लोकांना समान हक्क मिळावा म्हणून त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली त्यामध्ये सर्व धर्म आणि जातीतील लोक या संघटनेचा एक भाग बनू शकले फुले यांच्या कामांमध्ये त्यांच्या पत्नीचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे ते आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले हे भारतातील महिला शिक्षणाची जनक आहे आज भारतामध्ये ज्या मुली शिक्षण घेत आहे त्यांचे सर्व श्रेय फुले यांना जाते असे मनोगत यावेळी वैद्यकीय अधिकारी किशोर गीते यांनी व्यक्त केले. यावेळी डॉक्टर अमोल केवट राजेश शिंगणे पराड स्वाती शिरसाट अंभोरे खारडे लाकडे व कर्मचारी हजर होते