Home शिर्डी चार वर्षीय अलिना मकरानी हिचा रमजानचा पहिला रोजा ,

चार वर्षीय अलिना मकरानी हिचा रमजानचा पहिला रोजा ,

116

शौकत भाई शेख

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील मौलाना अब्दुलरहीम मकरानी यांची ४ वर्षीय कन्या कु.अलिना या चिमुकलीने माहे रमजान या पवित्र महिन्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.कडक उन्हाळयात जिवाची लाही लाही होत असताना,अशा अवघड परिस्थितीतही माहे रमजानमध्ये पहाटे पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्न,पाणी न घेता जवळपास अखंड चौदा तासांचा रोजा (उपवास) पूर्ण केला आहे. इस्लाम धर्मात पाच तत्वांपैकी रोजा याला विशेष महत्त्व आहे, दिवसभरात थुंकीही न गिळता पवित्र असा रोजा मुस्लिम बांधव पुर्ण करतात,असा कडक रोजा (उपवास) कु.अलिना मकरानी हिनी पुर्ण केला असून पहिला रोजा सोडताना इफ्तारच्या वेळी (उपवास सोडताना) तिला मिठाई देऊन फुलांचा हार घालण्यात आला होता,एवढया लहान वयातच तिने रमजानचा पहिला उपवास केल्याने तिचे नातेवाईकांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.