Home पुणे ती त्या दोघांना प्रेम करत होती दोघे प्रेमवीर समोर आले अन ,...

ती त्या दोघांना प्रेम करत होती दोघे प्रेमवीर समोर आले अन , विपरितच घडले , ,

755

 

 

अमीन शाह

 

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून दोघांमध्ये भांडण झाले, यात एकाचा खून करण्यात आला. एकाच तरुणीवर दोघांच प्रेम होतं. तरुणी दोघांवर प्रेम करत असल्याचं भासवत होती. दोन्ही प्रेमवीर तरुणीमुळे समोरासमोर येऊन भिडले यात अल्पवयीन मुलाने आपल्या अल्पवयीन भावाच्या मदतीने प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकराचा खून केला आहे. संजय पाटील असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन भावांना दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेला संजय पाटील याचा विवाह झालेला आहे. त्याचे १९ वर्षीय तरुणी बरोबर प्रेमसंबंध होते. त्या अगोदर तरुणीचे अल्पवयीन मुलाबरोबर देखील प्रेमसंबंध असल्याचं पुढे आले. एकूणच काय तर, दोघांना तिने प्रेमात आंधळ केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून संजय पाटीलला तरुणी टाळत होती. तो मला त्रास देतो असे तरुणीने आपल्या अल्पवयीन असलेल्या प्रियकराला सांगितल होतं. पण, संजय हा तरुणीला धमकावत तुझे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल असे नेहमी म्हणायचा.
संजयला तिचे आणखी एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती. अनेकदा तरुणी फोन घेत नसल्याने संजय चिडला देखील होता. त्याने दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलाला फोन करून तरुणी शिवीगाळ केली. तू भेट तुला सांगतो असे धमकावत दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. प्रेयसीला होत असलेला त्रास पाहून संजयचा काटा काढायचं असे अल्पवयीन मुलाने ठरलं आणि भावाला सोबत घेतले. त्यानंतर अल्पवयीन मुलाने संजयला म्हाळुंगे परिसरात भेटण्यासाठी बोलावलं. तिथं संजय आला तरुणीवरून दोघांमध्ये भांडण झालं, प्रेयसीला होत असलेला त्रास, धमक्या याचा राग मनात धरून त्याचा त्या मुलीच्या अल्पवयीन मुलाने संजयच्या कानशिलात लगावली. त्यानंतर संजय काही करण्याच्या अगोदर दोन्ही अल्पवयीन भावांनी दगड आणि लोखंडी रॉडने संजयच्या डोक्यात प्रहार करून त्याचा खून केला.
या प्रकरणी अवघ्या काही तासातच दोन्ही अल्पवयीन मुलांना चऱ्होली परिसरातून दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतलं. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, सुमित देवकर, गणेश सावंत, गणेश हिंगे, अमर कदम, विनोद वीर, समीर रासकर यांच्या पथकाने महत्वपूर्ण कामगिरी केली.