सय्यद नजाकत
जालना / बदनापुर , दि. २९ :- एन आर सी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या सर्व पक्षीय भारत बंद ला बदनापूर शहरात शम्भर टक्के प्रतिसाद मिळाला असून सर्वच समाजाच्या व्यापाऱ्यांनी आपापले दुकाने व्यवहार सकाळपासून बंद मध्ये सहभाग नोंदविला तर सर्व पक्षीय रॅली काढून सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आले.
केंद्र सरकारने एन आर सी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व स्तरातून या कायद्याला विरोध सुरु झाला मात्र विरोधाला न जुमानता केंद्र सरकार ठाम असल्याने २९ जानेवारी रोजी भारत बंद पुकारण्यात आला असता बदनापूर शहरात नागरिक व व्यापाऱ्यांची २८ जानेवारी रोजी बैठक झाली व या बैठकीत बंद मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला व ३० जानेवारी रोजी कळकळीत बंद पाळण्यात आला यावेळी सर्व पक्षाच्या वतीने रॅली काढण्यात आली असता या रॅली मध्ये केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या,पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला .