(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी – घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख (फरहाना तबस्सुम शेख) यांचे स्थानातंर वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे करण्यात आले असून त्यांचे जागेवर अहमदपूर वरुन ए. ए. उतपट हे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी म्हणुन रुजु होणार आहे. तसेच घाटंजी येथील कोर्ट क्रंमाक 2 मध्ये दौंड (पुणे) येथुन ए. ए. कळमकर हे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी म्हणुन रुजु होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायाधिशांच्या बदल्या असे, श्रीमती जे. एम. काकडे बाभुळगांववरुन सोलापूर, के. के. चाफले वणीवरुन नाशिक, ए. डी. मारगोडे पुसदवरुन महाबळेश्वर, एम. बी. सोनटक्के पुसदवरुन कनकवली (सिंधुदुर्ग), एस. एस. ताट उमरखेडवरुन कोल्हापूर, ए. झेड. सैय्यद यवतमाळवरुन कराड, पी. आर. फुलारी पुसदवरुन नवापूर, जी. बी. पवार पुसदवरुन मोहाडी (भंडारा), एस. एच. अतकरे यवतमाळवरुन बारामती, ए. एस. जारुडे यवतमाळवरुन अहमदपूर, शाहीद साजीदुझ्झमा एम. एच. आर्णीवरुन औरंगाबाद, एस. आय. रामटेके दिग्रसवरुन औरंगाबाद, ए. एम. पाटील उमरखेडवरुन बिड, ए. ए. ढोके दारव्हावरुन धरणगांव, डी. बी. साठे पुसदवरुन उस्मानाबाद, पी. एस. गिरगांवकर यवतमाळवरुन पाटण (सातारा), एम. एस. यु. ए. यु. रहेमान कळंबवरुन विटा (सांगली), एस. एस. जोंधळे दारव्हावरुन अंमळनेर, बी. ए. नेरलीकर राळेगांववरुन उल्हासनगर, जी. एम. निमदेव यवतमाळवरुन वळुज (सातारा) ईत्यादी दिवाणी व फौजदारी न्यायाधिशांचे स्थांनातर करण्यात आल्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे रजिष्ट्रार जनरल एम. डब्ल्यू. चंदवाणी यांच्या स्वाक्षरीनिशी काढण्यात आले आहे.