यवतमाळ (प्रतिनिधी) – वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मीत रेल्वे प्रकल्पातील करोडो रुपयाच्या गौन खनिज भ्रष्टाचार प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत येतांना दिसत असतांना या प्रकरणाबाबत “आप” पार्टीचे पदाधिकारी फारच गंभीर असून या बाबत अधिक माहिती व पुरावे गोळा करतांना निदर्शनात येत असल्याचे विश्वसनिय सुत्राकडून कळाले. एव्हढेच नाहीतर नागपूर, मुंबई व दिल्ली येथील बड्या नेत्यांनी सुध्दा तक्रारकर्त्यांकडून सर्व माहिती गोळा करुन सर्व प्रकरण समजून घेतल्याचे समजते.
सविस्तर वृत्त असे की, “आप” पार्टीचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री. वसंतजी ढोके यांनी नॅशनल युनियन आॅॅफ जर्नलिस्टचे राज्य सचिव अमोल कोमावार यांचेशी संपर्क करुन वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पातील गौनखनिज भ्रष्टाचार प्रकरणाबाबत सविस्तर माहिती, दस्ताऐवजासह घेऊन दिल्ली दरबारी पाठविली. तक्रारकर्ता व पत्रकार अमोल कोमावार यांच्या म्हणण्यानूसार ह्या भ्रष्टाचार मालिकेतील मुख्य कोण ? राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या अधिका-यांवर का कारवाई केल्या जात नाही ? कंत्राटदाराला अभय कुणाचे ? तसेच स्थानिक पातळीवर सत्ताधीश व विरोधी गट कश्या पध्दतीने भ्रष्टाचार करुन सामान्य माणसाला मुर्ख् बनवितात याबद्दल सर्व सविस्तर पुराव्यानिशी उच्च न्यायालयात तसेच प्रसार माध्यमाव्दारे निश्चितच जनतेपुढे आणणार हे निश्चित. त्याच बरोबर जनहित याचिकेव्दारे या भष्ट्राचार प्रकरणी दोषी असलेले व दोषी अधिका-यांना पाठीशी घालणा-या वरील अधिका-यांवर त्वरीत व सक्त कारवाई करण्याचे तसेच “जनतेच्या खिशातून पगार व जनतेने निवडलेल्यांचे आदेश” असे धोरण अवलंबणा-या अधिका-यांवर शिक्षा सुध्दा जनतेत्याच मताचा विचार करुन द्यावी असे उच्च न्यायालयाचा नागपूर खंडापिठाकडे मागणी केल्याचे समजले.
दि.8/5/2022 रोजी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात “आप” पार्टीचे सर्वेसर्वा मा. श्री.अरविंद केजरीवाल हे रेल्वे गौन खनिज भ्रष्ट्राचार प्रकरणात कोणती भुमिका घेतील. याबाबत अजून कार्यकर्त्यांना अजुन निश्चित माहिती नसल्याचे कळले परंतु महाराष्ट्रात “आप” पार्टीला आपला जम बसवायचा असल्यामुळे असे भ्रष्ट्राचार प्रकरण म्हणजे पार्टीला “पर्वणी” च समजल्या जाईल असे वाटते. ह्या विदर्भातील रेल्वे उत्खननातील सर्वात मोठ्या करोडो रुपयाचा भ्रष्ट्राचार “आप” पार्टीचे बडे नेते कोणत्या पध्दतीने हाताळतिल याकडे विदर्भातील “आप” कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे. याच बरोबर नॅशनल युनियन आॅफ जर्नलिस्ट चे याच भ्रष्ट्राचार प्रकरणातील आंदोलनाकरीता “आप” पार्टीचाच मोठा सहभाग असल्याचे सुध्दा विश्वसनिय सुत्रांकडून बोलल्या जात आहे.