.
हनिफ शेख
, अंढेरा प्रतिनिधी: – नागपूर वरुण पुणे कडे जाणार ट्रक दोन ते तीन दिवसांपासून असोला फाट्या लागत रोडवर एका बाजूने उभा केला होता . मात्र ट्रक शेजारून जात दुर्गंधीचा वास येवू लागल्याने पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता ट्रकच्या बंद कॅबिनमध्ये एका ३० वर्षीय तरुणांचा कुजलेला मृतदेह कपड्याने झाकलेला दिसून आला . पोलिसांना खून असल्याचा संशय आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना असोला फाट्यावर ८ मे रोजी सकाळी उघडकीस आली .
सविस्तर असे की अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या चिखली ते दे राजा या हायवे रोडवरील मेरा खुर्द पासून तर धोत्रा नंदई या १०ते १५ किलोमीटर पर्यत सरकारी घनदाट जगल असल्याने अनेकवेळा या घनदाट जगलामध्ये खून करुण आणून टाकलेले बाहेरच्या जिल्ह्यातील मृतदेह सापडले आहे . त्याच बरोबर मनुबाई खडका शिवारात दोन इसमाचे मृतदेह आणून टाकले होते . अशा घटना दरवर्षी घडत असल्याने दिवसेंदिवस खून करणाऱ्या गुन्हेगाराचे मनोबल वाढल्याने ८ मे रोजी आनखी एक मृतदेह आढळून आला .त्यामध्ये पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मेरा खुर्द ते दे मही या हायवे रोडवरील असोला फाट्या नजीक एक लोखंड गज भरलेला ट्रक क्र एम एच ४६ ए आर २६९४ हा गेल्या चार दिवसापासून रोडवर उभा होता रोडवरून वाहने ये जा करीत होते मात्र याकडे वाहन धारकांनी दुर्लक्ष केले होते परंतू ८ मे रोजी सकाळी ट्रकच्या बाजूला जनावरे चारणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा वास येवू लागला हा वास कोठून येतो म्हणून त्या दिशेने गेले असता रोडवर एक उभा ट्रक दिसून असला त्यामुळे लगेच माहिती ठाणेदार गणेश हिवरकर यांना फोनवर दिली . माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलिसांचा ताफा पोहचला . पंचासमक्ष पंचनामा केला असता पोलिसांना ट्रकच्या कॅबिनचे दोन्ही बाजूचे दरवाजे बंद केलेले होते . दरवाजाच्या काचा फोडून दरवाजा उघडून आत मध्ये पाहले असता अंगावर चादर टाकून ठेवलेला एका ३० वर्षाच्या तरुणांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला . आणि कागदपत्रे तपासणी वरुण समजले की मृतकाचे नाव दिनेश वर्मा वय अंदाजे ३० वर्ष राहणार आंबेडकर नगर उत्तर प्रदेश हा ट्रक लोखंड घेवून नागपूर वरून पुणे जात असल्याचे समजले मात्र हा प्रकार खुनाचा असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे . वृत्त लिहिपर्यत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता .